शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकणाऱ्यांवर कॅमेऱ्याचा वॉच

By admin | Updated: July 7, 2014 00:15 IST

जालना: कचरा टाकू नका... येथे घाण होते.. अशी अनेकदा विनंती करुनही न ऐकणाऱ्यांसाठी एका नागरिकाने चक्क सीसीटीव्ही कॅमेरा बसवून कचरा टाकणाऱ्यावर वॉच ठेवला आहे.

जालना: कचरा टाकू नका... येथे घाण होते.. अशी अनेकदा विनंती करुनही न ऐकणाऱ्यांसाठी एका नागरिकाने चक्क सीसीटीव्ही कॅमेरा बसवून कचरा टाकणाऱ्यावर वॉच ठेवला आहे.जुना जालना भागातील कचेरी रोडवर अमित कासारी नावाचे गृहस्थ राहतात. त्यांच्या घराजवळील जागेत परिसरातील अनेक नागरिक सातत्याने कचरा आणून टाकत असल्याने तेथे उकिरडा तयार झाला. याचा त्रास कासारी यांच्यासह अनेकांना होत आहे. कासारी यांनी नागरिकांना येथे कचरा टाकू नका, दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अस्वच्छता वाढत आहे, असे वारंवार सांगितले. परंतु काही नागरिकांचा कचरा टाकण्याचा दिनक्रम बंद होईना.अखेर कासारी यांनी तब्बल साडेसहा हजार रुपये खर्च करुन सीसीटीव्ही कॅमेरा बसवून कचरा टकाणाऱ्यांवर वॉच ठेवला आहे. याविषयी अमित कासारी म्हणाले, घराजवळ कचरा टाकू नये यासाठी आम्ही तीन ते चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहोत. कचऱ्यामुळे दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.घरात बसणे अवघड होऊन बसले आहे. नागरिक ऐकत नाहीत. नगरपालिका तसेच नगरसेवकांनाही अनेकदा सांगितले. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. अखेर कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतला. कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधात नगर पालिका तसेच पोलिसांत तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)