शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणुक; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक गुजरातमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 19:42 IST

मास्टरमाईंड आरोपीला घेतले सोबत

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसीतून अमेरिकन नागरिकांना फसविणाऱ्या कॉल सेंटरचा राजवीर प्रदीप शर्मा हाच मास्टरमाईंड असल्याचे चाैकशीतून समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी त्यास सोबत घेत गुजरातमधील अहमदाबाद येथील त्याच्या घराची झाडाझडती घेतली. त्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. राजवीरचा काका बलवीर वर्मा ऊर्फ पाजी याचा शोध गुजरातमध्ये घेतला जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार अमेरिकन लोकांची फसवणूक करण्यासाठी राजवीरचा काका बलवीर वर्मा ऊर्फ पाजी यानेच सिंडिकेट तयार केले होते. त्याला जॉन नावाच्या व्यक्तीने ही कल्पना दिली. त्यासाठी वर्माने त्याचा पुतण्या राजवीरला या कामात सोबत घेतले. छत्रपती संभाजीनगर येथील फारुकीशी संपर्क होताच तोही सिंडिकेटमध्ये सहभागी झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. ४५ टक्के जॉनचे, तर ५५ टक्के वर्मा अशी वाटणी व्हायची. राजवीरच्या रूमची झडती घेताना पोलिसांना त्याच्या लॅपटॉपमध्ये अमेरिकन प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र, न्यायालयीन आदेशांची बनावट कागदपत्रे तसेच अमेरिकन पीडित नागरिकांची नावे व डेटा सापडला. बलवीरने २५ ते ३० कोटी रुपयांची गुंतवणूक करून कॉल सेंटर उभारले. बलवीर-राजवीरचे नातेवाईक मोहाली, अहमदाबाद, मुंबई तसेच परदेशात वास्तव्यास असून, या सिंडिकेटला त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडूनच साहाय्य मिळत असल्याची माहिती फारुकीच्या चौकशीत उघड केली होती. रॅकेटमधील प्रमुख आरोपी फारुकी, मनवर्धन राठोड, सतीश लाडे यांची डीसीपी प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी रविवारी देखील एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात चार तासांहून अधिक काळ चौकशी केली.

जप्त साहित्य फॉरेन्सिक लॅबकडेबोगस कॉल सेंटरमधून जप्त केलेले लॅपटॉप, मोबाईल हे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज (एफएसएल) येथे तपासणीसाठी पाठवले आहे. त्यातील आरोपींनी केलेले कॉल, बँकांचे ट्रान्जेक्शन, डिजिटल डेटा तपासला जात आहे; मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. हा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गीता बागवडे, एपीआय मोहसीन सय्यद, अमोल म्हस्के, पीएसआय उत्तरेश्वर मुंडे, छाया लांडगे, लालखान पठाण यांचे पथक तपास करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : American Citizen Call Center Scam: Police Hunt Culprits in Gujarat

Web Summary : A call center defrauding Americans was traced to Rajveer Sharma. Police searched his Ahmedabad home, finding key documents. His uncle, Verma, allegedly created the syndicate, aided by 'John'. The investigation continues, with seized materials sent for forensic analysis.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरUSअमेरिका