शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी वाहून जात असताना ‘ते’ व्हिडीओ करण्यात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 11:32 IST

बुधवारी झालेल्या पावसात तालुक्यात माणुसकीही वाहून गेल्याचा अनुभव आला.

ठळक मुद्देसिल्लोड तालुक्यात माणुसकी गेली वाहून 

- श्यामकुमार पुरे  

सिल्लोड (जि. औरंगाबाद) : बुधवारी झालेल्या पावसात तालुक्यात माणुसकीही वाहून गेल्याचा अनुभव आला. सावखेड्याजवळ   पूर्णानदीला आलेल्या पुरात पंडित पांडू गोंगे (३०, रा. सावखेडा) हा  शेतकरी वाहून जात असताना काही हौशी लोकांनी त्याचा व्हिडिओ केला. त्यास पाण्यात जाण्यासाठी कोणी रोखले नाही वा वाचविण्याचा प्रयत्नही केला नाही.  या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सावखेडा गावात मेडिकल स्टोअर नसल्याने आईचे रक्तदाब आणि मधुमेहावरील औषध आणण्यासाठी तो सावखेडा येथून बोरगाव बाजार येथे पायी जात होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो रस्ता ओलांडत होता. तो चालत असताना दुरून काही हौशी लोकांनी त्याचा व्हिडिओ केला. पुढे थोड्या अंतरावर रस्त्यावरून तोल जाऊन हा शेतकरी पूर्णानदीच्या प्रवाहात वाहून गेला. तो  वाहून जाताना लोकांनी त्याला पाहिले; पण कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. यावेळी हे सर्वजण व्हिडिओ तयार करण्यात मग्न होते. हा शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ‘माणुसकी’ वाहून गेल्याचे हे दर्शन सर्वांना झाले.  या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, फौजदार विकास आडे, कर्मचारी मुश्ताक शेख, दीपक इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली व त्याचा शोध घेतला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने व पुराचे पाणी वाढत असल्याने उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.  

दोन नद्यांचा संगमसावखेडा गावातून पूर्णा नदी वाहत जाऊन या नदीला घाटनांद्र्याकडून येणारी चारणा नदी मिळते. दोन नद्यांचा येथे संगम होतो. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढतो. या दोन नद्यांच्या संगमात हा शेतकरी वाहून गेला. 

शेतकऱ्याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला बोलविण्यात येणार आहे. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर शोध घेतला जाईल. जोरदार पाऊस सुरू असल्याने रात्री शोध घेणे शक्य नाही. घटनास्थळी तलाठी अशोक निकाळजे, मंडळ अधिकारी जी. व्ही. दांडगे यांना पाठविण्यात आले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेणे सुरूच आहे.- रामेश्वर गोरे, तहसीलदार, सिल्लोड  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfloodपूरriverनदी