शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

घुंगर्डे हदगावातही डेंग्यूसदृश्य तापाचा बळी

By admin | Updated: September 12, 2014 00:24 IST

जालना/घुंगर्डे हदगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात काही गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले आहे. अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे या तापामुळे

जालना/घुंगर्डे हदगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात काही गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले आहे. अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे या तापामुळे भक्तीसिंग अर्जुनसिंंग पवार (वय १४) या बालकाचा ११ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. डेंग्यूसदृश्य तापाने बळींची संख्या ४ वर पोहोचली आहे.गेल्या दोन आठवड्यांपूर्वी भोकरदन तालुक्यातील पद्मावती, जळगाव सपकाळ, कोदोली, लेहा इत्यादी गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाच्या रुग्णांची संख्या वाढली. त्यात पद्मावती येथील भावंड व जळगाव सपकाळ येथील एक तरूण अशा तिघांचा मृत्यू झाला. या प्रश्नावरून स्थायी समितीच्या सभेत वादळी चर्चा झाली होती. आरोग्य व पंचायत या दोन्ही विभागांच्या हलगर्जीपणामुळे साथरोगांचे तीन बळी गेले, असा आरोप सदस्यांनी केला होता. विशेष म्हणजे याच बैठकीत काही सदस्यांनी वर्तमानपत्रांमधील बातम्यांचे दाखले देत दावे केले, त्यावर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी आपण वर्तमानपत्रे वाचत नसल्याचे म्हटल्याने सभागृहाने आश्चर्य व्यक्त केले होते.एकीकडे प्रशासन दाखवित असलेली अनास्था आणि त्यावर अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या उत्तरांमुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, घुंगर्डे हदगावात तापाचे आणखी ३० ते ३५ रुग्ण आहेत. भक्तीसिंगच्या मृत्यूमुळे गावात खळबळ उडाली असून आरोग्य विभागाचे पथक अद्यापही दाखल झालेले नाही. गावात डासांचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे धूरफवारणी करण्याची गरज आहे. गोदाकाठचा परिसर असल्याने घुंगर्डे हदगावसह परिसरातील गावांमध्येही साथरोग निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)भक्तीसिंग पवार हा विद्यार्थी जालना शहरात ज्ञानज्योत प्राथमिक शाळेत आठव्या इयत्तेत शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी भक्तीसिंग शाळेत रजा घेऊन आपल्या गावाकडे गेला होता. घुंगर्डे हदगावातील घाण, दुर्गंधीमुळे तो तापाने फणफणला. सुरूवातीला कुटुुंबियांनी गावातच प्राथमिक उपचार केले. मात्र ताप राहत नसल्याने त्यास ९ सप्टेंबर रोजी जालना येथील दीपक हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गुरूवारी त्याचा मृत्यू झाला. भक्तीसिंग याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. अनुराधा राख यांनी हा मृत्यू डेंग्यूसदृश्य तापाने झाल्याचे आपल्या वैद्यकीय अहवालात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.जालना शहरातही तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र डेंग्यूसदृश्य ताप नसल्याचा दावाही काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. ग्रामीण भागात साथरोग मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून शहरातही धूरफवारणी करणे आवश्यक आहे. नगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेच्या कामावर अधिक भर देण्यात आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.