दुरुस्तीचा देखावा करून पळवली बीएसएनएलची १0 लाखांची केबल

By Admin | Updated: December 13, 2014 00:29 IST2014-12-13T00:19:08+5:302014-12-13T00:29:16+5:30

औरंगाबाद : भारत संचार निगम लिमिटेडची केबल चोरी करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे.

BSNL's 10 lakhs cable ran out of retaliation | दुरुस्तीचा देखावा करून पळवली बीएसएनएलची १0 लाखांची केबल

दुरुस्तीचा देखावा करून पळवली बीएसएनएलची १0 लाखांची केबल

औरंगाबाद : भारत संचार निगम लिमिटेडची केबल चोरी करणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. आकाशवाणीसमोरच गजबजलेल्या जालना रस्त्यावर असलेल्या भूमिगत टेलिफोन डक्टमधील दहा लाख रुपये किमतीची केबल चोरांनी कापून नेली. या घटनेमुळे चार दिवसांपासून बीएसएनएलचे इंटरनेट आणि दूरध्वनीचे सुमारे दोन हजार ग्राहक सेवेपासून वंचित झाले आहेत. बीएसएनएलने युद्धपातळीवर केबल जोडणीचे काम सुरू केले. हे काम पूर्ण होण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी लागणार आहे.
बीएसएनएलने शहरात सर्वात मोठी केबल लाईन टाकलेली आहे. विशेषत: जालना रोडवर विविध ठिकाणी बीएसनएनलचे भूमिगत टेलिफोन डक्ट आहेत. अशाच प्रकारचा मोठा डक्ट आकाशवाणी कार्यालयासमोरच आहे. आकाशवाणी ते सिंचन भवनदरम्यान असलेल्या या डक्टमध्ये उतरून चोरट्यांनी २०० मीटर लांबीच्या दोन केबल चोरून नेल्या. विशेष म्हणजे त्यातील एका केबलवर ८०० व दुसऱ्या केबलवर १२०० ग्राहकांना टेलिफोन, इंटरनेटची सेवा दिली जात होती. ८ डिसेंबर २०१४ रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हत्याराने ही केबल कापून नेली. विशेष म्हणजे या दोन्ही केबल अवजड असल्याने ही चोरी करण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा चोरट्यांचा सहभाग असावा.

चोरीनंतर सुमारे २००० ग्राहकांची सेवा बंद पडली. सकाळी १० वाजेनंतर ग्राहक सेवा सेंटरला टेलिफोन आणि इंटरनेट बंद पडल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या. आधी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना क्रमानुसार काम करण्याचे सांगितले; मात्र एकाच वेळी एवढ्या मोठ्या तक्रारी येत असल्याने बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आकाशवाणीसमोरील डक्ट उघडून पाहिला, तेव्हा तेथील दोन केबल कापून नेण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी दिलीप बारवाल या वरिष्ठ अधिकाऱ्याने तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

Web Title: BSNL's 10 lakhs cable ran out of retaliation