मुला-मुलीने बापाला झोडपले

By Admin | Updated: July 6, 2014 00:36 IST2014-07-06T00:31:23+5:302014-07-06T00:36:07+5:30

औरंगाबाद : किरकोळ घरगुती कारणावरून मुला-मुलीने बापाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी न्यायनगरात घडली.

The boy and the child upset the father | मुला-मुलीने बापाला झोडपले

मुला-मुलीने बापाला झोडपले

औरंगाबाद : किरकोळ घरगुती कारणावरून मुला-मुलीने बापाला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी न्यायनगरात घडली. विशेष म्हणजे यासाठी मुला व मुलीला त्यांच्या आईनेही मदत केली. मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
न्यायनगरातील प्रल्हाद कचरू मगरे (५५) हे सकाळी घरात चप्पल घालून आले. तेव्हा मुलगा अरविंद व मुलगी रत्नाने घरात चप्पल घालून का आलात? असा जाब विचारला. त्यावरून बाप- लेकात वाद झाला. तेव्हा मुलगा, मुलीसोबत मगरे यांची पत्नी अनुराधा या तिघांनी शिवीगाळ करून मगरे यांना बेदम मारहाण केली. तसेच मुलानेही बापाच्या डोक्यात लाकडी दांडा घालून गंभीर जखमी केले. या प्रकरणी मगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जमादार देशमुख हे तपास करीत आहेत.

Web Title: The boy and the child upset the father