शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

बिंदुसरा तळाला

By admin | Updated: November 3, 2014 00:40 IST

सोमनाथ खताळ, बीड बीडकरांनो पाणी सांडताय.. थांबा ! ज्या धरणातून आपल्याला पाणी पुरवठा केला जातोय त्याची पाणी पातळी शुन्याच्या खाली गेली आहे. केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी आता बिंदुसरा धरणात

सोमनाथ खताळ, बीडबीडकरांनो पाणी सांडताय.. थांबा ! ज्या धरणातून आपल्याला पाणी पुरवठा केला जातोय त्याची पाणी पातळी शुन्याच्या खाली गेली आहे. केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी आता बिंदुसरा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे बीड शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. पालीकेच्या वतीने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी माजलगाव धरणातून पाणी घेण्यात आले आहे.बीड शहराला पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणात सध्या केवळ ०.२९ दलघमी पाणी शिल्लक आहे. हे पाणी केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच असून पालीकेतील पाणी पुरवठा विभागाने हे पाणी संपण्याची तारीख १५ नोव्हेंबर जाहिर केली आहे. त्यामुळे यावर्षी बीड शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. गतवर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस झाल्यामुळे आणि बिंदुसरा धरणातील गाळ काढल्यामुळे धरणात भरपुर प्रमाणात पाणीसाठा होता. उन्हाळ्यात शेवटी शेवटी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र यावर्षी हिवाळा सुरू होतो ना होतो तोच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.सध्या बीडशहराला चार ते पाच दिवसाला दीड तास पाणी सोडण्यात येत असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एम.एस.वाघ यांनी सांगितले. प्रत्यक्षात अनेक भागात आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळत आहेत. पाणीसाठा पाहता बीडकरांनीच आता पाणी बचत करण्याची अवश्यकता असल्याचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.पाणी आरक्षीत ठेवण्याची मागणीयावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी माजलगाव धरणात विद्यूत पंप टाकले आहेत, ते शेतकरी शेतीपंपाद्वारे सर्रास पाणी उपसा करू लागले आहेत. असे झाले तर पाणी लवकर संपू शकते, त्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी बीड, माजलगावातील नागरिकांमधून होत आहे.बिंदुसरा धरण आटल्यामुळे माजलगावच्या धरणातून बीड शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र या धरणातही अल्प पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले. ४या धरणातून बीड शहरास माजलगाव शहर आणि तालुक्याला पाणीपुरवठा केला जात असल्याने हे पाणी संपण्याची भीतीही यावेळी अभियंता वाघ यांनी व्यक्त केली.धरणातून पाणी उपसा४पाणी टंचाईची परिस्थिती दिसून येत असतानाही माजलगाव धरणातून सर्रास शेतीसाठी पाणी उपसा केला जात आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा अरोप होत आहे. ४शेतीसाठी पाणी उपसा चालु राहिला तर धरणातील पाणी अवघ्या महिन्यातच संपू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे़