शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही पंडित एकत्र येऊनही तालुक्यात भाजपलाच मताधिक्य

By admin | Updated: May 18, 2014 00:47 IST

सखाराम शिंदे , गेवराई गेवराई मतदारसंघात लोकसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही पंडितांची मोट बांधण्यात पवारांना वरकरणी यश आले असले तरी तालुक्यात दोन्ही पंडितांचे प्रयत्न मात्र निष्फळ ठरले आहेत.

सखाराम शिंदे , गेवराई गेवराई मतदारसंघात लोकसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही पंडितांची मोट बांधण्यात पवारांना वरकरणी यश आले असले तरी तालुक्यात दोन्ही पंडितांचे प्रयत्न मात्र निष्फळ ठरले आहेत. या मतदारसंघात भाजपला मोठे मताधिक्य मिळाले आहे. यामुळे तालुक्यात अ‍ॅड. लक्ष्मण पवार यांनी केलेल्या कामाची चर्चाही नागरिकांमधून होत आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात आ. बदामराव पंडित व आ. अमरसिंह पंडित यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य अवघ्या महाराष्टÑालाच माहित आहे. हे दोघे नात्याने काका-पुतणे असले तरी राजकारणाच्या आखाड्यात एकदुसर्‍याला ‘चित-पट’ करण्यातच त्यांनी आपले राजकीय कसब वापरले आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत आ. बदामराव पंडित व अमरसिंह पंडित हे दोन्ही वेगवेगळ्या पक्षात होते. त्यामुळे या दोघांच्याही कार्यकर्त्यात कमालीचे वितुष्ठ आहे. दोघांची मनमिळवणी करण्यात राष्टÑवादीच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले असले, तरी स्थानिक पातळीवर तालुक्यात दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते कोठेच सोबत आल्याचे दिसून आले नाही. दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांत अशी ‘बेकी’ तर भाजपला अ‍ॅड. लक्ष्मण पवार यांच्यासारखा मिळालेला तरुण चेहरा यामुळे भाजपच्या यशाचा मार्ग सुकर झाला. तसे पाहिले तर या निवडणुकीत अ‍ॅड. लक्ष्मण पवार यांनीही रात्रंदिवस एक करीत प्रचाराची राळ उठवून दिली. त्यांच्यासाठी ही खरी ‘अग्निपरीक्षा’च होती. यात ते उत्तीर्ण झाल्याचे दिसून येत आहे. गेवराई येथे दोन्ही पंडितांना एका ‘म्यानात’ आणण्यात राष्टÑवादी यशस्वी झाली. मात्र, हे जोडी मतदारांना भावली नाही. मतदारांनीच त्यांना नाकारल्याचे दिसून आले. तसे पाहिले तर लोकसभेचा शंखनाद झाला की, गेवराईमध्ये काय होणार? दोन्ही पंडित एक येतील का? याची चर्चा सुरू झाली होती. तर एकीकडे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दोघांना एकत्र राहण्याचे आदेशही दिले होते. यानंतर दोन्ही आमदार अनेक ठिकाणी एकाच मंचावर ‘मांडीला मांडी’ लावून बसल्याचे दिसून आले. पक्षश्रेष्ठींपुढे त्यांना दोघे एकत्र दिसून आले, मात्र गेल्या वीस वर्षांपासून दुभंगलेली मने एकत्र आली का? एकमेकांना पाण्यात पाहणार्‍यांचे खरोखरच मनोमिलन झाले का? हा खरा प्रश्न आहे. राष्टÑवादीच्या प्रचाराचा नारळही गेवराईत फोडण्यात आला. येथे दोन्ही पंडितांनी शड्डू ठोकले, मात्र याचा उपयोग काही झाला नाही. कारण गेवराई मतदारसंघात दोन्ही पंडितांचे कार्यकर्ते कधीच एकत्र आले नाहीत ना त्यांनी प्रचार एकत्र केला. दोन्ही आमदारांच्या कॉर्नर बैठका, सभा, मतदारांच्या गाठीभेटी, रॅली सर्वच स्वतंत्र होत असल्याने मतदारांमध्ये याचा वेगळाच संदेश गेला. यामुळे गेवराई मतदासंघात राष्टÑवादी दिसायला तगडी वाटत असली तरी काम काही झालेच नाही. तालुक्यात ८ जि.प. सदस्य, १६ पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती यासह बहुसंख्य ग्रामपंचायत राष्टÑवादीच्या ताब्यात आहेत. असे असतानाही जेथे राष्टÑवादीचे पदाधिकारी आहेत तेथेही राष्टÑवादीला मताधिक्य मिळू शकले नाही. राष्टÑवादीची ही पिछेहाट आत्मपरिक्षण करावयास भाग पाडणारी आहे. सुरेश धस,बदामराव पंडित, अमरसिंह पंडित यांनी गाव, वाडी, वस्ती पिंजून काढले यामुळे मताधिक्याचा विश्वास होता, मात्र फासे उलटेच पडले. मतदारसंघात भाजपची धुरा अ‍ॅड.लक्ष्मण पवार यांच्याकडे होती. वास्तविक त्यांच्याकडे यंत्रणाही तोकडी आहे व कार्यकर्त्यांची फळीही फारशी नाही. याउपरही त्यांनी गाव-वाडी वस्तीवर जाऊन मतदारांना साद घातली. याला गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा व मोदी लाटेचाही फायदा झाला. यामुळे येथून तब्बल ३१ हजारांची लीड मिळाली. यामुळे तालुक्यात आता अ‍ॅड. पवार यांच्या कामाची चर्चा सुरू आहे.