शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जन्मत: कर्णबधिर बालक म्हणाले, आई, बाबा...जॉनी जॉनी येस पपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:34 IST

औरंगाबाद : अवघा १८ महिन्यांचा असताना मुलाला ऐकू येत नसल्याचे समजले. परंतु तो आता आई म्हणतोय, बाबा म्हणतोय, हे ...

ठळक मुद्दे३२ मुलांवर कॉक्लियर इम्प्लांट : टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आणखी १०० मुलांना मिळणार श्रवणशक्ती

औरंगाबाद : अवघा १८ महिन्यांचा असताना मुलाला ऐकू येत नसल्याचे समजले. परंतु तो आता आई म्हणतोय, बाबा म्हणतोय, हे सांगताना वडिलांच्या चेहऱ्यांवर मोठा आनंद झळकत होता. तर जन्मजात कर्णबधिर मुलगा सर्वांसमोर ‘जॉनी जॉनी येस पपा’ म्हणताना पाहून एका आईला भावना अनावर होत होत्या. निमित्त होते डॉ. हेडगेवार रुग्णालयात आयोजित कार्यक्रमाचे.शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात टाटा ट्रस्ट, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्ष यांच्या माध्यमातून १०० कर्णबधिर मुलांवर आगामी वर्षभरात ‘कॉक्लियर इम्प्लांट’ ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यानिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात यापूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या मुलांच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी टाटा ट्रस्टचे वैयक्तिक निधी प्रमुख कुमार चैतन्य, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, राष्ट्रीय बालसहायता योजनेचे राज्य समन्वयक राजेश सोनार, डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे अनिल भालेराव, डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांची उपस्थिती होती.यावेळी कुमार चैतन्य म्हणाले, यापूर्वी केवळ मुंबईपर्यंत काम केले जात होते. परंतु आता नागपूरसह औरंगाबादेतही मुलांच्या उपचारासाठी काम क रणार आहोत. रुग्णालयात विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ३२ कर्णबधिर मुलांवर ‘कॉक्लियर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया करण्यात आली. आगामी वर्षभरात १०० मुलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा ट्रस्ट ५ लाख, मुख्यमंत्री निधीतून २ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. डॉ. हेडगेवार रुग्णालयात जवळपास ८० बालकांची या शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी आहे. कार्यक्रमास डॉ. प्रसन्न पाटील, डॉ. भारत देशमुख, डॉ. दीपक भिसेगावकर, डॉ. धनश्री भिसेगावकर, डॉ. मंजरी ब्रह्मपुरीकर, अभिजित सबनीस यांच्यासह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मुख्यमंत्री सहायता निधीतून हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या चैतन्य कोरडे आणि त्याच्या कुटुंबियांनी ओमप्रकाश शेटे यांचा सत्कार केला.शस्त्रक्रियेच्या चौथ्या दिवशी वडिलांचा मृत्यू‘कॉक्लिअर इम्प्लांट’ झालेल्या बालकाच्या आईने यावेळी मनोगत व्यक्त केले. मुलाने ऐकावे, बोलावे, अशी या बालकाच्या वडिलांची इच्छा होती. बालकावर इम्प्लांट झाले. परंतु इम्प्लांटच्या चौथ्याच दिवशी वडिलांचा मृत्यू झाला. मुलाचे बोलणे, ऐकणे ते पाहू शकले नाही. या मनोगतामुळे कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक जण नि:शब्द झाला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य