जन्मत: कर्णबधिर बालक म्हणाले, आई, बाबा...जॉनी जॉनी येस पपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:34 IST2019-07-04T23:34:20+5:302019-07-04T23:34:38+5:30

औरंगाबाद : अवघा १८ महिन्यांचा असताना मुलाला ऐकू येत नसल्याचे समजले. परंतु तो आता आई म्हणतोय, बाबा म्हणतोय, हे ...

 Born to the hapless child said, "Mom, Baba ... Johnny Johnny Yes Papa | जन्मत: कर्णबधिर बालक म्हणाले, आई, बाबा...जॉनी जॉनी येस पपा

जन्मत: कर्णबधिर बालक म्हणाले, आई, बाबा...जॉनी जॉनी येस पपा

ठळक मुद्दे३२ मुलांवर कॉक्लियर इम्प्लांट : टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आणखी १०० मुलांना मिळणार श्रवणशक्ती


औरंगाबाद : अवघा १८ महिन्यांचा असताना मुलाला ऐकू येत नसल्याचे समजले. परंतु तो आता आई म्हणतोय, बाबा म्हणतोय, हे सांगताना वडिलांच्या चेहऱ्यांवर मोठा आनंद झळकत होता. तर जन्मजात कर्णबधिर मुलगा सर्वांसमोर ‘जॉनी जॉनी येस पपा’ म्हणताना पाहून एका आईला भावना अनावर होत होत्या. निमित्त होते डॉ. हेडगेवार रुग्णालयात आयोजित कार्यक्रमाचे.
शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात टाटा ट्रस्ट, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्ष यांच्या माध्यमातून १०० कर्णबधिर मुलांवर आगामी वर्षभरात ‘कॉक्लियर इम्प्लांट’ ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यानिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात यापूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या मुलांच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी टाटा ट्रस्टचे वैयक्तिक निधी प्रमुख कुमार चैतन्य, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, राष्ट्रीय बालसहायता योजनेचे राज्य समन्वयक राजेश सोनार, डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे अनिल भालेराव, डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांची उपस्थिती होती.
यावेळी कुमार चैतन्य म्हणाले, यापूर्वी केवळ मुंबईपर्यंत काम केले जात होते. परंतु आता नागपूरसह औरंगाबादेतही मुलांच्या उपचारासाठी काम क रणार आहोत. रुग्णालयात विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ३२ कर्णबधिर मुलांवर ‘कॉक्लियर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया करण्यात आली. आगामी वर्षभरात १०० मुलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा ट्रस्ट ५ लाख, मुख्यमंत्री निधीतून २ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. डॉ. हेडगेवार रुग्णालयात जवळपास ८० बालकांची या शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी आहे. कार्यक्रमास डॉ. प्रसन्न पाटील, डॉ. भारत देशमुख, डॉ. दीपक भिसेगावकर, डॉ. धनश्री भिसेगावकर, डॉ. मंजरी ब्रह्मपुरीकर, अभिजित सबनीस यांच्यासह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मुख्यमंत्री सहायता निधीतून हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या चैतन्य कोरडे आणि त्याच्या कुटुंबियांनी ओमप्रकाश शेटे यांचा सत्कार केला.
शस्त्रक्रियेच्या चौथ्या दिवशी वडिलांचा मृत्यू
‘कॉक्लिअर इम्प्लांट’ झालेल्या बालकाच्या आईने यावेळी मनोगत व्यक्त केले. मुलाने ऐकावे, बोलावे, अशी या बालकाच्या वडिलांची इच्छा होती. बालकावर इम्प्लांट झाले. परंतु इम्प्लांटच्या चौथ्याच दिवशी वडिलांचा मृत्यू झाला. मुलाचे बोलणे, ऐकणे ते पाहू शकले नाही. या मनोगतामुळे कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक जण नि:शब्द झाला.

Web Title:  Born to the hapless child said, "Mom, Baba ... Johnny Johnny Yes Papa