पालिकेसाठी भाजपचा स्वबळाचा नारा

By Admin | Updated: March 20, 2016 01:12 IST2016-03-20T01:08:05+5:302016-03-20T01:12:01+5:30

हिंगोली : येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर नशीब आजमावण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला असून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

BJP's own voice slogan for the party | पालिकेसाठी भाजपचा स्वबळाचा नारा

पालिकेसाठी भाजपचा स्वबळाचा नारा

हिंगोली : येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर नशीब आजमावण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेतला असून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाची बैठक आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, गोवर्धनअण्णा वीरकुंवर, प्रा.दुर्गादास साकळे, माजी जि.प.उपाध्यक्ष मिलिंद यंबल, यशोदाबाई कोरडे, बी.डी. बांगर, कैलास काबरा, प्रशांत सोनी आदींची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष आ. मुटकुळे म्हणाले, भाजपाची राज्यात सत्ता असल्याने येथे विकासकामे करताना त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात कामाला लागणे गरजेचे आहे.
इच्छुकांनी जनतेच्या समस्यांकडे लक्ष दिल्यास आगामी काळात निवडणुकीत यश मिळविणे अवघड नाही. तर बांगर म्हणाले, भाजपा स्वबळावर लढणार असल्याने सत्तेची चांगली संधी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. संघटन व विकासकामे या दोन्हींकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.

Web Title: BJP's own voice slogan for the party