शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपुत्रांच्या ‘एंट्री’ने दिग्गजांपुढे आव्हान

By admin | Updated: October 3, 2014 23:58 IST

पांडुरंग खराबे , मंठा मंठा-परतूर विधानसभा मतदार संघात निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून यावेळी मंठा तालुक्याचे भूमिपूत्र, उद्योजक सोमनाथ साखरे यांनी शिवसेनेकडून तर गायक प्रा. राजेश सरकटे

पांडुरंग खराबे , मंठा मंठा-परतूर विधानसभा मतदार संघात निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून यावेळी मंठा तालुक्याचे भूमिपूत्र, उद्योजक सोमनाथ साखरे यांनी शिवसेनेकडून तर गायक प्रा. राजेश सरकटे राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक आखाड्यात उतरले असल्याने प्रस्तापित मातब्बर पुढाऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.मंठा-परतूर विधानसभा निवडणुकीत गेल्या अनेक दशकांपासून मंठा तालुक्यातून प्रभावी पक्षाचा वजनदार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला नव्हता. माजीमंत्री रामप्रसाद बोराडे, माजी आ. भगवानराव बोराडेनंतर विधानसभेचे नेतृत्व आजपर्यंत परतूर तालुक्याकडे असून यावेळी मात्र शिवसेनेकडून उद्योजक सोमनाथ साखरे तर राष्ट्रवादीकडून गायक प्रा. राजेश सरकटे निवडणूक रिंगणात उतरले असल्याने या मतदार संघातील दिग्गज कॉँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश जेथलिया, मनसेचे बाबासाहेब आकात, भाजपाचे बबनराव लोणीकर या तीनही अनुभवी दिग्गजांपुढे भूमिपूत्रांचे आव्हान उभे राहिले आहे.साखरे यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे. तर प्रा. सरकटे यांनी मातोश्री हंसादेवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली वर्षभर सामाजिक उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.या निवडणुकीत विद्यमान आ. सुरेशकुमार जेथलिया कॉँग्रेसकडून विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असून त्याकडे विकासाबरोबरच मोठी कार्यकर्त्यांची फळी जमेची बाजू मानल्या जाते. तर मनसेचे उमेदवार बाबासाहेब आकात यांच्याकडे शिक्षण संस्थेचे जाळे, कार्यकर्त्यांचा फौजफाटा, सहकारी संस्था ताब्यात असल्याने त्यांना प्रबळदावेदार मानले जाते. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी दोनवेळा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करुन तळागाळापर्यंत पक्ष संघटन मजबुत करुन शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलने करुन दमदार नेतृत्व अशी छबी निर्माण केली असल्याने त्यांच्याकडे या जमेच्या बाजू आहेत. असे असले तरी गांधीजींचे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्याकडे चला, गड्या आपुला गाव बरा म्हणून कर्मभूमीकडून जन्मभूमीकडे नशिब अजमावणारे शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ साखरे, राष्ट्रवादीचे सरकटे मंठा-परतूर समृध्द करण्यासाठी राजकीय आखाड्यात उतरले आहेत.पूर्णवेळ राजकारण करणाऱ्या मातब्बरांशी हे कशी जुंज देणार, कोण बाजी मारणार, राजकीय डावपेच काय असणार याबाबत चर्चा रंगत आहेत. एकूणच नवखे व दिग्गज यांच्या लढतीकडे संपूर्ण मतदार संघाचे चित्र लागून आहे. ठिक ठिकाणी चर्चांना उधाण आले आहे.