शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपास सर्व्हिस रोडचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:09 IST

: बायपास परिसरात निसर्गरम्य वातावरणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, केवळ सर्व्हिस रोड नसल्याने रस्ता ओलांडताना काळजाचा थरकाप होताना दिसतो. जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बायपासची निर्मिती झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहतींनी परिसर गजबजून गेला, आता बायपास फक्त नावालाच राहिला असून, तो लोकवस्तीतील रस्ता ठरला आहे. याच रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सर्व्हिस रोड तयार होणे अत्यंत गरजेचे आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा सवाल : वादग्रस्त मालमत्ता वगळता मोकळ्या जागेचा विचार का नाही

औरंगाबाद : बायपास परिसरात निसर्गरम्य वातावरणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, केवळ सर्व्हिस रोड नसल्याने रस्ता ओलांडताना काळजाचा थरकाप होताना दिसतो. जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी बायपासची निर्मिती झाली. रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहतींनी परिसर गजबजून गेला, आता बायपास फक्त नावालाच राहिला असून, तो लोकवस्तीतील रस्ता ठरला आहे. याच रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सर्व्हिस रोड तयार होणे अत्यंत गरजेचे आहे. महानुभाव आश्रम चौक ते देवळाई चौकापर्यंत सर्व्हिस रोडसाठी अडथळा ठरणाऱ्या मालमत्तेवर मार्किंग करण्यात आली आहे; परंतु मालमत्तेच्या संपादनाचा मुद्दा पुढे करून सर्व्हिस रोडच्या प्रश्नावर पांघरून घातले आहे.अपघाताने पोलीस समोर आलेबायपासवर जडवाहनांची वाहतूक व दुचाकी, चार चाकीची लगबग तसेच शाळकरी मुलांची नेआण करणाºयांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर आठवडाभराच्या अंतराने आॅगस्ट महिन्यात एकापाठोपाठ एक असे अनेक बळी गेले. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस यंत्रणा पुढे आली. मात्र, बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न सोडविण्यासाठी मनपा आणि राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने वर हात केले आहे.सर्व्हिस रोडवर पुन्हा टपºयामनपाने टपºया हटवून सर्व्हिस रोड मोकळा करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु एमआयटीसमोर सर्व्हिस रोड असून, त्याच रोडवर पुढे संग्रामनगरपर्यंत मोकळाच रस्ता आहे. काही मालमत्ता सोडल्या तर नियमानुसार अनेकांनी सर्व्हिस रोडची जागा सोडूनच बांधकाम केले आहे, असे निदर्शनास येते. सर्व्हिस रोडचे काम रेंगाळल्याने पुन्हा टपºया बसविणे सुरू झाले आहे, अतिक्रमण पुन्हा वाढत असेल, तर मग त्या रस्त्याचे काम मनपा हाती का घेत नाही, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.भुयारी बोगदा आणि सर्व्हिस रोडदेवळाई चौकात रेल्वे फाटकात दर अर्ध्या तासाला थांबण्यापेक्षा काही तरी तोडगा काढून भुयारी मार्ग काढल्यास नागरिकांचा प्रवास सोयीचा होईल. अनेकदा देवळाई परिसरातील नागरिकांना संग्रामनगर पुलावरून वळसा घेऊन जालना रोड गाठावा लागतो. सर्व्हिस रोडचा प्रश्न रखडला आणि भुयारी मार्गाचा कुणी विचार करण्यास तयार नाही. शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी असल्याने रविवारशिवाय घरी राहत नाही. आंदोलन छेडण्यासाठी रस्त्यावर येता येत नाही, अशी शोकांतिका सातारा-देवळाईतील नागरिकांची झाली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका