शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भाग्यश्रीचे पतीसोबत गोडीगुलाबीचे ढोंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:55 IST

भाग्यश्री होळकरने पतीच्या हत्येची तीन महिन्यांपूर्वीच सुपारी दिली होती. परंतु तेव्हापासून तिने आपल्या वर्तनात जबरदस्त बदलाचे ढोंग रचले. पती- पत्नीतील संबंध स्नेहाचे असल्याचे नातेवाईकांना भासविण्यासाठी ती पतीसोबत अत्यंत गोडीगुलाबीने वागू लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भाग्यश्री होळकरने पतीच्या हत्येची तीन महिन्यांपूर्वीच सुपारी दिली होती. परंतु तेव्हापासून तिने आपल्या वर्तनात जबरदस्त बदलाचे ढोंग रचले. पती- पत्नीतील संबंध स्नेहाचे असल्याचे नातेवाईकांना भासविण्यासाठी ती पतीसोबत अत्यंत गोडीगुलाबीने वागू लागली. प्रत्येक कार्यक्रमालाही पतीसोबत आवर्जून जात होती, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांची छत्रपतीनगरातील राहत्या घरी शुक्रवारी रात्री गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी मृताची पत्नी भाग्यश्री हिच्यासह चौघांना अटक केली. भाग्यश्रीने सुपारी देऊन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. भाग्यश्रीने अत्यंत शांत डोक्याने कट रचून जितेंद्रची हत्या केल्याचे समोर आल्याने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वर्ग दोन पदी कार्यरत असलेल्या भाग्यश्रीचे पतीसोबत पटत नव्हते. चारित्र्यावर संशय घेऊन जितेंद्र भाग्यश्रीला त्रास देई. यावरून पती-पत्नीत सतत भांडणे होत. ही बाब नातेवाईकांनाही माहीत होती. या त्रासातून मुक्ती मिळविण्यासाठी जितेंद्रला संपविण्याचा निर्णय तिने घेतला. किरण गणोरेच्या मदतीने तीन महिन्यांपूर्वी हत्येचा कट रचला. पती-पत्नीतील वादाची किनार हत्येला लागू नये, यासाठी तिने मनोमिलनाचे नाटक वठविणे सुरू केले. पतीसोबत गोडीगुलाबीने ती राहू लागली. कटाचाच भाग म्हणून ती जितेंद्रचे बोलणे ऐकून घेऊन त्याला उलट उत्तरे देणे तिने थांबविले. तो म्हणेल तसे ती वागू लागली