शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

समाधान मेळाव्यात लाभार्थ्यांची रीघ

By admin | Updated: August 15, 2014 00:03 IST

सेलू : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ वृद्धापकाळ, विशेष सहाय्यता निधीसाठी लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात दाखल केलेले प्रस्ताव गहाळ झाल्यामुळे शेकडो लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत़

सेलू : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ वृद्धापकाळ, विशेष सहाय्यता निधीसाठी लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात दाखल केलेले प्रस्ताव गहाळ झाल्यामुळे शेकडो लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत़ त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विलंब होत असल्यामुळे आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून चार दिवसांत प्रकरणे निकाली काढा, अशी तंबी दिली़ महसूल विभागाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियाना अंतर्गत न.प.च्या श्री साईनाट्य मंदिरात समाधान शिबिराचे आयोजन १४ आॅगस्ट रोजी केले होते़ अध्यक्षस्थानी आ़ रामप्रसाद बोर्डीकर होते़ उपविभागीय अधिकारी पी़ एस़ बोरगावकर, तहसीलदार आसाराम छडीदार, तालुका कृषीे अधिकारी राम रोडगे, नगराध्यक्ष सुरेश कोरडे, हेमंतराव आडळकर, पवन आडळकर, नामदेव डख, सदाशिव निकम, विलास रोडगे, आसाराम कटारे, आदींची उपस्थिती होती़ तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ तसेच दारिद्र्य रेषेखालील असलेल्या कुटुंब प्रमुखांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना देण्यात येणारे विशेष सहाय्यता निधीसाठी प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल केले़ परंतू, संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याने हे प्रस्ताव गहाळ केले़ त्यामुळे लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी नवा पेच प्रशासना पुढे उभा राहिला आहे़ समाधान मेळाव्यात या योजनेच्या लाभार्थी वृद्ध महिलांनी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्यापुढे हा प्रश्न उपस्थित करून अनुदानाची मागणी केली़ प्रस्ताव सापडण्याचे काम लाभार्थ्यांनाच करावे लागत आहे़ एका शिपायालाच या विभागाचा कारभार देण्यात आला होता़ त्यामुळे संतप्त झालेल्या आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना खडसावून चार दिवसात पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करा, अशी सूचना केली़ यावेळी शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र व विशेष सहाय्यता निधी तसेच निराधार पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले़ शासनाच्या अनेक योजना आहेत परंतु शेवटच्या घटकापर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करणे आवश्यक आहे़ पंचायत समितीच्या योजना राबविताना सत्ताधारी राजकारण करत आहेत़ त्यामुळे अनेक कामे विलंबाने होत असल्याची टीका आ़ बोर्डीकर यांनी केली़ यावेळी कृषी विभागाच्या योजनांची माहिती कृषी अधिकारी राम रोडगे यांनी दिली़ प्रास्ताविक नायब तहसीलदार निलेश पळसकर यांनी केले. सूत्रसंचालन मुकुंद आष्टीकर तर मंडळ अधिकारी संजय काकडे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)