शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आग्या मोहळाचा अजिंठा लेणीत ५० पर्यटकांना डंख; उपाययोजनात पुरातत्व विभाग अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:56 IST

या घटनांमुळे पर्यटक भयभीत झाले आहेत.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : पुण्याहून अजिंठा लेणी बघण्यास आलेल्या ५० पर्यटकांवर मंगळवारी दुपारी ४ वाजता मधमाशांनी हल्ला केला. रविवारीही दुपारी ३ वाजता २७ पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे पर्यटक भयभीत झाले आहेत.

अजिंठा लेणी क्रमांक २, ४ व २६ या लेणीच्या माथ्यावर प्रत्येकी १, तर लेणी क्रमांक १०च्या माथ्यावर ६ असे एकूण १० मधमाशांचे पोळे बसले आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून अजिंठा लेणी पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांवर या मधमाश्या हल्ला करीत आहेत. खराब असलेल्या जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यामुळे अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली असताना पुरातत्व विभाग याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करीत नसल्याने अशा घटना वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर पुण्याहून आलेल्या ५० पर्यटकांवर मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दिनेश सोपान गायकवाड (वय ४० वर्षे), दिव्या ताठे (वय २१ वर्षे), अर्चना दिनेश गायकवाड (वय ३५ वर्षे), हिंदवी दिनेश गायकवाड (वय ७ वर्षे), स्वराज दिनेश गायकवाड (वय १४ वर्षे) यांच्यासह ५० पर्यटकांवर मधमाशांची अचानक हल्ला केला. रविवारीही २७ पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला होता. दोन्ही घटनेत जखमी झालेल्या पर्यटकांवर फर्दापूर, अजिंठा, सिल्लोड, पहूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथील विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी झालेल्या हल्ल्यात जोधपूर येथील एक पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. या व्यक्तीच्या शरीरातून चक्क ७० ते ८० विषारी काटे फर्दापूर येथील एका खासगी डॉक्टरने काढले आहेत. मधमाशांनी चावा घेतल्यानंतर पर्यटकांनी जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळापळ केली. त्यात खाली पडून एका पर्यटकाचा हात मोडला.

चार महिन्यांत एकूण ८०० पर्यटकांना चावादि. ५ एप्रिल रोजीही दुपारी कर्नाटकातील २५ ते ३० शाळकरी मुलांवर मधमाशांनी हल्ला केला होता. २२ एप्रिल रोजी लेणी क्रमांक २६ जवळ थायलंडमधील आठ पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला होता. थायलंडमधील एक महिला या हल्ल्यामुळे बेशुद्ध पडली होती. तिला उपचारासाठी अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या चार महिन्यांत एकूण ८०० पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतला आहे.

उपाययोजना करण्यात पुरातत्व विभाग अपयशीपुरातत्व विभागाच्या वतीने गतवर्षी दर सोमवारी सुटीच्या दिवशी मधमाशा हुलवणारे बोलाऊन किंवा तैनात कर्मचाऱ्यांमार्फत धूर दाखवून त्यांना पळवून लावले जात होते; मात्र या धुरामुळे लेणीच्या चित्राकृतींना धोका निर्माण होतो, अशी तक्रार काही लोकांनी केल्याने पुरातत्व विभाग आता काहीच हालचाल करत नाही. त्यांच्या डोळ्या देखत पर्यटक मधमाशांच्या चाव्याने विव्हळत असताना पुरातत्व विभागाचे अधिकारी काहीही उपाययोजना करीत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAjantha - Elloraअजंठा वेरूळ