शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

बीड शहरात १५ लाखांचा गुटखा पकडला

By admin | Updated: July 27, 2015 01:13 IST

बीड: शहरातील शाहूनगर भागातील एका घरामध्ये पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या पथकाने शनिवारी रात्री ११ च्या सुमारास छापा टाकून तब्बल १४ लाख ७० हजार रुपयांचा गुटखा पकडला

बीड: शहरातील शाहूनगर भागातील एका घरामध्ये पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या पथकाने शनिवारी रात्री ११ च्या सुमारास छापा टाकून तब्बल १४ लाख ७० हजार रुपयांचा गुटखा पकडला. वर्षभरातील गुटख्यावरील ही सर्वात मोठी कारवाई आहे. शेख राजु शेख सगीर अहमद (रा. शाहु नगर, बीड) असे त्या आरोपीचे नाव असून तो फरार झाला आहे. पोलीस अधीक्षक पारसरकर यांच्या पथकातील व शिवाजीनगर ठाण्याचे सपोनि गजानन भीमराव जाधव यांना खबर मिळाली की, शाहूनगर भागातील बीएसएनएल कार्यालयसमोरच्या भागातील एका घरात लाखो रुपयांचा गुटखा आहे. त्यावरुन सपोनि जाधव हे फौजफाट्यासह तेथे गेले. त्यांनी शेख राजू याच्या घरात प्रवेश करुन तपासणी केली असता एका खोलीमध्ये गोण्या असल्याचे दिसून आले. त्यापैकी काही गोण्या फोडल्या असता त्यात गुटख्याची पाकिटे असल्याचे दिसून आले.दरम्यान, पोलीस छापा टाकणार असल्याची माहिती शेख राजू यास मिळताच तो पळून गेला. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुटखा जप्तीची कारवाई पूर्ण केली. जप्त गुटख्याचे मूल्यमापन केले असता ४९ गोण्यांमध्ये १४ लाख ७० हजार रुपयांचा माल असल्याचे समोर आले. रविवारी सकाळी प्रभारी सहायक आयुक्त सागर तेरकर यांना या छाप्याची माहिती देण्यात आली. तेरकर यांच्या फिर्यादीवरुन शेख राजू शेख सगीर अहमद याच्याविरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि यु.व्ही. बारवकर करीत आहेत. मुख्य आरोपीचा शोध सुरूचशाहूनगर भागात शेख राजू याच्या घरावर छापा टाकुन जवळपास १५ लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. आरोपीने इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा कोठुन आणला?, कोणी दिला ? कसा दिला ? आदी माहिती घेतली जाणार असल्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी सांगितले. आरोपीचा शोध सुरु असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)