शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कमल तलावाचे सुशोभीकरण ५० लाख रुपयांतून होणार

By admin | Updated: July 1, 2014 01:07 IST

औरंगाबाद : ऐतिहासिक कमल तलावाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव आज प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता.

औरंगाबाद : ऐतिहासिक कमल तलावाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव आज प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला होता. समितीने त्यास मान्यता देऊन सुशोभीकरणासाठी वार्षिक योजनेतून चालू वर्षी ५० लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला.नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या तलावाची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांना या तलावाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. तत्पूर्वी, या तलावाचा विकास आराखडाही तयार करण्यात आला होता. त्यावर सुमारे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आजच्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडला. त्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर पालकमंत्र्यांसह सर्वच सदस्यांनी त्यास मान्यता दिली.नावीन्यपूर्ण योजनेतून चालू वर्षी या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे, असे थोरात यांनी सांगितले. शहरात शासनाने तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे केंद्र सुरू करावे, अशी मागणी काही सदस्यांनी केली होती. त्यावरही पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच असे केंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही दिले. ट्रॅफिक गार्डनसाठी २५ लाखसिद्धार्थ उद्यानात ट्रॅफिक पार्क उभारण्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रस्ताव मांडण्यात आला होता.या ट्रॅफिक पार्कमध्ये लहान मुलांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले जाणार आहेत. पोलीस आयुक्तांच्या या प्रस्तावानुसार २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.