माणदेशी फाऊंडेशनचा आधार

By Admin | Updated: September 4, 2015 00:28 IST2015-09-04T00:28:47+5:302015-09-04T00:28:47+5:30

लातूर : माणदेशी फाऊंडेशनने दिलेले व्यावसायिक प्रशिक्षण आणि बिनव्याजी कर्जामुळे जिल्ह्यातील १२ जणींचा व्यवसाय आकाराला आला आहे.

The basis of the Mandi Foundation | माणदेशी फाऊंडेशनचा आधार

माणदेशी फाऊंडेशनचा आधार


लातूर : माणदेशी फाऊंडेशनने दिलेले व्यावसायिक प्रशिक्षण आणि बिनव्याजी कर्जामुळे जिल्ह्यातील १२ जणींचा व्यवसाय आकाराला आला आहे. फाऊंडेशनच्या मदतीमुळे या गृहिणी आता व्यावसायिक झाल्या आहेत.
आर्थिक परिस्थिती हलाखीची व पोट मजुरीवर असलेल्या कुटुंबातील गृहिणींचे बचत गट करून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम दीपशिखा प्रकल्पाने राबविला. त्यासोबतच माणदेशी फाऊंडेशनने प्रशिक्षण दिलेल्या महिलांना बिनव्याजी कर्जही उपलब्ध करून दिले. त्यामुळे मजुरीने जात असलेल्या १२ जणींचा वेगवेगळा व्यवसाय मोठा आकार घेत आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील कांचन मुरलीधर मोतीपल्ले यांनी माणदेशी फाऊंडेशनच्या कर्जावर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांचे पती अपघातात अपंग झाले. परंतु, ‘माणदेशी’मुळे कांचनतार्इंचा भाजीपाल्याचा व्यवसाय चांगला सुरू असल्याने अंथरुणावर असलेल्या पतीलाही त्या मदत करू शकल्या. आता कांचनताई रेणापूर व किनगाव येथे भाजीपाल्याचे दुकान सुरू करण्याच्या विचारात आहेत. हे त्यांना ‘दीपशिखा’मुळे साध्य करता आले आहे.
रेणापूर तालुक्यातील चाडगाव येथील शकुंतला माने यांचे किराणा दुकान, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील होनमाळ येथील आशाबी मैनोद्दीन सय्यद यांची पिठाची गिरणी, होनमाळ येथीलच भाग्यश्री सिद्धेश्वर हाळणे यांचा सुतळीचा व्यवसाय, कांता हरणे यांचे शेळीपालन, शिवपूर येथील शोभा टोपे यांचा शिवणकाम व पिठाची चिक्की, आनंदवाडी येथील अनुसया शिरूरे यांचे स्टेशनरी दुकान, अनिता सोमनाथ दवणे यांचा शेंगदाणे विक्री, येरोळ येथील अंजली पालकर यांचा भाजीपाला व्यवसाय, गणेशवाडी येथील सुनीता पेठे यांचा शेंगालाडू, होनमाळ येथील अरुणा शिंदे यांचा शिलाई, रुखवताचे साहित्य आणि खरोळा येथील सुरेखा कागले यांचा शिलाईचा व्यवसाय माणदेशी फाऊंडेशनच्या मदतीमुळे जोरात सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The basis of the Mandi Foundation