शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बी. कॉम. झालेली मीनाक्षी करायची तपासणी-गर्भपात; मेडिकल, डॉक्टरांसह लॅबचालकांचे नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:30 IST

आधीच्या दोन गर्भपात रॅकेटचे तपास आश्चर्यकारकरीत्या रखडले : दाम्पत्याच्या संपर्कातील ते चार डॉक्टर कोण? 

छत्रपती संभाजीनगर : कुठलेही वैद्यकीय शिक्षण, तांत्रिक पदवी नसताना मंगेश सुखदेव थोरात व त्याची पत्नी मीनाक्षी हे दाम्पत्य बिटेल डायग्नोस्टिक पॅथ लॅब चालवत होते. कोणाला संशय येऊ नये, म्हणून एन-५ परिसरासारख्या उच्चभ्रू वसाहतीमधील एका रहिवासी घराच्या पहिल्या मजल्यात त्यांनी ही लॅब थाटली होती. विशेष म्हणजे, लॅबच्या प्रथमदर्शनी बोर्डावर ना डॉक्टराचे नाव आहे किंवा लॅब चालकाच्या डिग्रीविषयी देखील उल्लेख ! भांडाफोड झाल्याचे कळताच मंगेश पसार झाला आहे.

पैशांच्या हव्यासापोटी मानवतेची मर्यादा ओलांडत रशीदपुऱ्यात दहावी उत्तीर्ण सय्यद इर्शाद अहेमद सय्यद गनी (६१), शाहेदा परवीन सय्यद इर्शाद अहमद (५१, दोघे रा. रशीदपुरा) व त्यांची मदतनीस नसरीन नजीर शेख (४७, आझाद चौक) यांनी घरातच औषधी, शस्त्रांच्या साठ्यासह ‘मिनी ऑपरेशन थिएटर’ उभारून अवैध गर्भपाताचा क्रूर धंदा सुरू केला होता. सोमवारी रात्री गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, कांचन मिरधे यांनी छापा टाकून याचा पर्दाफाश केला. बुधवारी पोलिसांनी यात आरोपींसमक्ष फ्लॅटचा पंचनामा करून त्यांचे जबाब नोंदवले. मंगेशचा शोध गुन्हे शाखेसह सिटी चौक पोलिसांचे पथक घेत आहे.

तपासणीसाठी ३५ हजार रुपयेमंगेश व मीनाक्षीचे ग्रामीण भागात मोठे नेटवर्क आहे. डॉक्टरांकडे गेलेल्या दाम्पत्याला मुली नकोशा असतील तर डाॅक्टर, मेडिकल चालकांकडून त्यांना गर्भलिंगनिदानासाठी मंगेशकडे पाठवले जायचे. अन्यत्र गर्भलिंगनिदानास बंदी असल्याचे सांगून सुरक्षेची हमी देत हे दोघे ३५ हजार रुपयांपर्यंत दर आकारायचे. विशेष म्हणजे, यापूर्वी उघडकीस आलेल्या रॅकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, टॅबचाच मंगेश वापर करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

मीनाक्षीची संचालिका म्हणून नोंदमे, २०२१ मध्ये सुरू झालेली ही लॅब दुसऱ्याच्या कागदपत्रांवर सुरू झाल्याचा संशय पोलिसांना आहे. ऑनलाइन नोंदीमध्ये मात्र मीनाक्षी मंगेश थोरात हीच या लॅबची संचालिका असल्याचे दाखवले आहे.तालुक्यातील पळशी येथे देखील मंगेशने अशीच एक लॅबची दुसरी शाखा उघडली होती. गेल्या पाच वर्षांत त्याने दोन शाखा उघडून महागड्या मशिनरी देखील खरेदी केल्याने गर्भपातासारख्या रॅकेटमधून पैसे कमावल्याचे सांगितले जात आहे. मीनाक्षी बी.कॉम. असतानाही महिलांच्या तपासण्यांपासून गर्भपातापर्यंत सर्व प्रक्रिया करत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली.

लॅबचालकांचाही रॅकेटमध्ये सहभागमार्च महिन्यामध्ये नारेगावमध्ये घरातच विवाहितेचा गर्भपात करण्यात आला. या गुन्ह्यात मराठवाड्यात अनेक वर्षांपासून गर्भपाताचे रॅकेट चालवणाऱ्या रेडिऑलॉजिस्ट डाॅ. संतोष सोनवणेनेच या गर्भपाताची सुपारी घेतल्याचे समजले. मात्र, यात मयूर पार्क येथील फेबो डोमेस्ट महालॅबचा अनिल जाधव (सपकाळ) याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.५ एप्रिल राेजी साताऱ्यात समोर आलेल्या गर्भपाताच्या रॅकेटमध्ये लॅबचालकाचा सहभाग निष्पन्न झाला होता. मात्र, दोन्ही गुन्ह्यांतील मास्टरमाइंडसह लॅबचालकाचा शोध मात्र लागू शकला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : B.Com Graduate Involved in Illegal Abortion Racket with Doctors, Labs

Web Summary : A B.Com graduate and her husband ran an illegal abortion racket, exploiting patients with high fees. They collaborated with doctors and lab owners. Police are investigating the network, including other lab operators involved in similar crimes across the state.
टॅग्स :Abortionगर्भपातCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर