शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीपर देखाव्यांनी वेधले लक्ष

By admin | Updated: September 10, 2014 00:53 IST

विसर्जन मिरवणुकीत विविध गणेश मंडळांनी सादर केलेल्या जनजागृतीपर देखाव्यांनी, पावली, लेझीम, झांज पथकांनी नागरिकांचे लक्ष वेधले.

औरंगाबाद : ढोल-ताशांचा गजर..लेझीम, झांज पथकाचा झंकार..गुलाल, रंगीबेरंगी फुलांची उधळण..आणि ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत मंगलमय वातावरणात सिडको-हडको परिसरातील गणेश मंडळांनी, गणेशभक्तांनी सोमवारी लाडक्या गणरायाला जल्लोषात निरोप दिला. विसर्जन मिरवणुकीत विविध गणेश मंडळांनी सादर केलेल्या जनजागृतीपर देखाव्यांनी, पावली, लेझीम, झांज पथकांनी नागरिकांचे लक्ष वेधले.सिडकोतील आविष्कार चौकातून विसर्जन मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. अयोध्यानगर, एन-७ येथील साई आदर्श गणेश मंडळाने आकर्षक पावलीने मिरवणुकीस सुरुवात केली. यावेळी मंडळाच्या पथकात ढोल, ताशे यासह विविध प्रकारची जवळपास ७० वाद्ये आणि ३०० सदस्यांचा सहभाग होता. पावलीसह याप्रसंगी मंडळाच्या सदस्यांनी विविध कसरती सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. विसर्जन मिरवणूक आविष्कार चौक, बजरंग चौक, बळीराम पाटील हायस्कूल, सिडको एन-९ एम-२, टी. व्ही. सेंटर चौकमार्गे गणेश विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचली. सिडको- हडकोतील गणेश मंडळांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मंडळांचे सादरीकरण पाहण्यासाठी आविष्कार चौक, बजरंग चौक, बळीराम पाटील हायस्कूल ते टी. व्ही. सेंटर चौकापर्यंत नागरिकांची गर्दी झाली होती. टी. व्ही. सेंटर चौक येथे गणेश महासंघातर्फे गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत होते. खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, अतुल सावे, बसवराज मंगरुळे, राजू खरे, नगरसेवक वीरभद्र गादगे, सिडको-हडको सार्वजनिक गणेश महासंघाचे अध्यक्ष साहेबराव घोडके, सिडको व्यापारी गणेश महासंघाचे अध्यक्ष बद्रीनाथ ठोंबरे, तसेच उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. लेझीम, झांज अन् जनजागृतीएन-७ येथील युवक गणेश मंडळाच्या ढोल- ताशांच्या गजराने आविष्कार चौक परिसर दणाणून गेला होता. एन-७ येथील ‘अयोध्येचा राजा ’अयोध्यानगर गणेश मंडळाच्या पथकात अग्रभागी असलेले उंट, घोडे यासह विविध वेशभूषा केलेल्या मुलांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. मंडळाच्या लेझीम पथकाने सादरीकरण करताना विविध पोस्टरच्या माध्यमातून झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, स्त्रीभ्रूणहत्या, अत्याचार थांबवा यासह विविध संदेश दिले. तसेच शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवनही मंडळाच्या पथकाने आपल्या सादरीकरणातून मांडले. गरवारे कम्युनिटी सेंटरच्या गरवारे बालभवन गणेश मंडळाच्या झांज पथकाचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. ग्रीव्हज कामगार कर्मचारी गणेश मंडळाने मिरवणुकीत पाणी वाचविण्याचा संदेश दिला. मृत्युंजय गणेश मंडळाच्या पथकाने पावली सादर केली.