शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन इंडिया’त औरंगाबादची झोळी रिकामीच

By admin | Updated: February 17, 2016 00:46 IST

संजय देशपांडे, औरंगाबाद ‘मेक इन इंडिया’ या प्रदर्शनात औरंगाबादची झोळी रिकामीच राहिली आहे. शेंद्रा- बिडकीन पार्कच्या ‘आॅरिक’सिटी या नामांतरावरच औरंगाबादची बोळवण करण्यात आली आहे.

संजय देशपांडे, औरंगाबाद‘मेक इन इंडिया’ या प्रदर्शनात औरंगाबादची झोळी रिकामीच राहिली आहे. शेंद्रा- बिडकीन पार्कच्या ‘आॅरिक’सिटी या नामांतरावरच औरंगाबादची बोळवण करण्यात आली आहे. स्टरलाईटचा प्रकल्प नागपूरला पळविण्यावर सामंजस्य कराराद्वारे शिक्कामोर्तब करण्यात आले, तर जागतिक दर्जाचा वाहन उद्योग औरंगाबादेत येणार असल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणाही फोल ठरली आहे.मुंबईत १३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ‘मेक इन इंडिया’ या प्रदर्शनाकडून औरंगाबादकरांना मोठ्या अपेक्षा होत्या. यानिमित्त राज्यात सहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातून २८ लाख नवा रोजगार निर्माण होईल, असे सांगितले जात आहे; परंतु गुंतवणुकीबाबत झालेले सर्व सामंजस्य करार विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रासाठीच झाल्याचे दिसून येते. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेंद्रा- बिडकीन मेगा पार्कमध्ये एखादा मोठा उद्योग आणला जाईल, अशी ग्वाही स्वत: उद्योगमंत्र्यांनी दिली होती. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.‘आॅरिक’ ठरले स्वप्नरंजनऔरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (आॅरिक) स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली होती. ‘आॅरिक’म्हणजे काही तरी भव्यदिव्य असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न यानिमित्त करण्यात आला; परंतु शेंद्रा- बिडकीन मेगा पार्कचेच हे नामांतर असून, प्रत्यक्षात औरंगाबादकरांना नवीन काहीच मिळणार नाही. ‘आॅरिक’मध्ये उद्योगांना स्वस्त विजेचा २४ तास पुरवठा, माहिती तंत्रज्ञानाचे अद्ययावत जाळे, प्रशस्त रस्ते, पाण्याचा पुनर्वापर, जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था, उद्याने, रुग्णालये उभारली जाणार आहेत; परंतु तेथे मोठा उद्योग आणण्यासाठी मात्र कसलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. मोठा उद्योग न आल्यास ‘आॅरिक’ हे स्वप्नरंजनच ठरेल, अशी भीती या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. ‘आॅरिक’ या नामांतराशिवाय ‘मेक इन इंडिया’त औरंगाबादच्या हाती काही लागले नाही.काय म्हणाले होते उद्योगमंत्री? ‘सीआयआय’च्या ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र, इन्हेस्ट इन टू मराठवाडा’ या गुंतवणूक परिषदेचा समारोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत २९ जानेवारी रोजी झाला होता. ‘वाहननिर्मिती क्षेत्रात जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविलेला मोठा उद्योग औरंगाबादेत आणण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यात आम्हाला नक्कीच यश मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मेक इन इंडिया’ प्रदर्शनात याबाबत अधिकृत घोषणा करतील,’ असे वक्तव्य देसाई यांनी केले होते. हा वाहन उद्योग कोणता असेल, याबाबत उद्योग जगतात चर्चितचर्वण सुरू होते. ह्युंदाई, मर्सिडीझ, महिंद्रा, अशी नावे घेतली जात होती; परंतु मर्सिडीझचा प्रकल्प चाकणला जाणार असल्याचे, तर महिंद्राची गुंतवणूक नाशिकमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्योगमंत्र्यांची घोषणा तूर्त तरी फोल ठरली आहे.