औरंगाबादेत पैशांचा पाऊस !

By Admin | Updated: June 23, 2014 00:29 IST2014-06-23T00:01:22+5:302014-06-23T00:29:43+5:30

औरंगाबाद : सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळील पेट्रोलपंपासमोर शनिवारी रात्री पैशांचा पाऊस पडला. काय, धक्का बसला ना. औरंगाबादवर वरुणराजा रुसला आहे.

Aurangabad rain money! | औरंगाबादेत पैशांचा पाऊस !

औरंगाबादेत पैशांचा पाऊस !

औरंगाबाद : सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळील पेट्रोलपंपासमोर शनिवारी रात्री पैशांचा पाऊस पडला. काय, धक्का बसला ना. औरंगाबादवर वरुणराजा रुसला आहे. अख्खा मृग कोरडा गेला आहे. तेथे चक्क पैशांचा पाऊस पाडणारा एक जण प्रकटतो आणि काही अवधीतच निघून जातो? पण हे खरे आहे.
त्याचे झाले असे की, शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रिक्षाचे भाडे देत असताना एक प्रवाशाच्या हातातील पैशाचे बंडल खाली पडले आणि तेवढ्यात वाऱ्याच्या झुळुकीने सारे पैसे उडाले. बिचारा तो प्रवासी उडालेले पैसे गोळा करण्याची धावपळ करीत असताना घडले वेगळेच.
रोडने जाणाऱ्या- येणाऱ्या लोकांची रस्त्याच्या कडेला पडलेले पैसे गोळा करण्यासाठी झुंबड उडाली. हा सारा प्रकार पाहून मग दुचाकीस्वारांनीही थांबून पैसे उचलण्याची संधी डावलली
नाही. ज्याच्या हाती जेवढ्या नोटा लागतील तेवढ्या घेऊन तेथून पसार झाले. बिचारा तो प्रवासीही मग तेथून हताश होऊन गुपचूप निघून गेला.
या घटनेची चर्चा परिसरात वाऱ्यासारखी पसरली. कोणी म्हणे रिक्षातून आलेल्या एकाने रस्त्यावर पैसे फेकून निघून गेला; पण तो कोण होता, त्याचे नाव काय, तो कोठून आला, कोठे गेला, हे मात्र, कोणालाही ठाऊक नाही.

Web Title: Aurangabad rain money!