औरंगाबाद - नगर महामार्गावर अतिक्रमणधारकांना नोटीस

By Admin | Updated: June 23, 2014 00:32 IST2014-06-23T00:15:07+5:302014-06-23T00:32:40+5:30

वाळूज महानगर : औरंगाबाद - नगर महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे अपघात वाढल्याचे वृत्त लोकमतने १६ जूनच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

Aurangabad - Notice to encroachers on the city highway | औरंगाबाद - नगर महामार्गावर अतिक्रमणधारकांना नोटीस

औरंगाबाद - नगर महामार्गावर अतिक्रमणधारकांना नोटीस

वाळूज महानगर : औरंगाबाद - नगर महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणांकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे अपघात वाढल्याचे वृत्त लोकमतने १६ जूनच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या बातमीची दखल घेत वाहतूक शाखेने या महामार्गावरील अतिक्रमणधारक व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे.
या मुख्य महामार्गावर ए. एस. क्लबपासून ढोरेगावपर्यंत अनेक व्यावसायिकांनी ठिकठिकाणी अतिक्रमण केले असून, फुटपाथही ताब्यात घेतले आहेत.
या महामार्गावर अतिक्रमणे वाढल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात वाढत चालल्यामुळे आज वाहतूक शाखेच्या छावणी विभागाने अतिक्रमणधारक व्यावसायिकांना नोटीस दिली आहे.

Web Title: Aurangabad - Notice to encroachers on the city highway