शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत जलकुंभावर मध्यरात्री पालिका कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:02 IST

महापालिकेच्या अनियमित पाणीपुरवठ्याला कंटाळलेल्या संतप्त जमावाने सोमवारी मध्यरात्री सिडको एन-५ येथील जलकुंभावरील चार कर्मचाºयांना बेदम मारहाण केली.

ठळक मुद्देसिडको एन-५ : मंगळवारी सकाळी कामबंद आंदोलन

औरंगाबाद : महापालिकेच्या अनियमित पाणीपुरवठ्याला कंटाळलेल्या संतप्त जमावाने सोमवारी मध्यरात्री सिडको एन-५ येथील जलकुंभावरील चार कर्मचाºयांना बेदम मारहाण केली. यात एका कर्मचाºयाचा दातही पडला. या निषेधार्थ पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाºयांनी मंगळवारी सकाळी जलकुंभावरच कामबंद करून ठिय्या आंदोलन केले. हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे आश्वासन मनपा पदाधिकारी, आयुक्तांनी दिल्यानंतर कर्मचाºयांनी आंदोलन मागे घेतले.काशीनाथ लालमन राठोड, भीमसिंग रामसिंग परदेशी, तानाजी शिवराम पोटकुळे, देवदत्त अशोक दांडगे, अशी जखमी कर्मचाºयांची नावे आहेत. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संतप्त जमाव सिडको एन-५ येथील जलकुंभावर चालून आला. हडको, एन-१२ भागात पाणी का सोडले नाही, असा जाब विचारत जमावाने कर्मचाºयांना मारहाण केली. उपअभियंता अशोक पद्मे यांना ही माहिती त्वरित देण्यात आली. लालमन राठोड यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकी व इतर वाहनांमधून आलेले हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी कॅ मेºयाचे फुटेज तपासले. हे फुटेज पोलिसांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मंगळवारी सकाळी ही माहिती मिळताच टँकरचालक, लाईनमन यांनी बहुजन शक्ती कामगार संघटनेचे अध्यक्ष कृष्णा बनकर यांच्या नेतृत्वाखाली जलकुंभावर ठिय्या आंदोलन सुरू केले. महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यात येईल. त्यासाठी आम्ही स्वत: पोलीस आयुक्तांची भेट घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.पोलीस आयुक्तांची भेटमनपा पदाधिकारी व अधिकाºयांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची दुपारी भेट घेतली. मनपा मुख्यालय, महत्त्वाच्या जलकुंभावर जमाव चालून येतो. या भागात पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी के ली. महापौर घोडेले यांनी सांगितले की, महापालिकेकडे असलेले माजी सैनिक जलकुंभावर तैनात के ले जातील. महापालिकेकडे अतिक्रमण हटावसाठी २७ पोलीस कर्मचारी व एक अधिकारी आहे. हे कर्मचारी इतर कामे करण्यास नकार देतात. शहरात महिना-महिना अतिक्रमण हटावच्या कारवाया होत नाहीत. पोलिसांना बसून पगार देण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. इतर कामांसाठीदेखील या पोलिसांचा वापर व्हावा, यासाठी आयुक्तांना पत्र देण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले. 

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका