शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

अचलेरचे आरोग्य उपकेंद्र आठ महिन्यांपासून कुलूपबंद

By admin | Updated: May 26, 2014 00:26 IST

अचलेर : ग्रामीण भागातील रूग्णांना किमान प्राथमिक उपचार तरी वेळेवर मिळावेत, या उद्देशाने जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सुरू करण्यात आली

अचलेर : ग्रामीण भागातील रूग्णांना किमान प्राथमिक उपचार तरी वेळेवर मिळावेत, या उद्देशाने जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सुरू करण्यात आली. परंतु, प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे हा उद्देश साध्य होताना दिसून येत नाही. कर्मचार्‍यांअभावी हे उपकेंद्र चक्क आठ महिन्यांपासून कुलूपबंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य रूग्णांना आष्टा अथवा आलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागत आहे. तर काही वेळा खाजगी दवाखान्याची पायरी चढावी लागते. लोहारा तालुक्यातील आचलेर येथे रूग्णांची सोय लक्षात घेऊन उपकेंद्र सुरू करण्यात आले. सुरूवातीला हे उपकेंद्र अत्यंत चांगल्या स्थितीत सुरू होते. परंतु, मागील दीड ते दोन वर्षापासून या उपकेंद्रालाच घरघर लागली आहे. येथे आरोग्य सेविकेची दोन आणि एमपीडब्ल्यूचे एक अशी तीन पदे मंजूर आहेत. परंतु, आजघडीला एकही कर्मचारी येथे कार्यरत नाही. त्यामुळे हे उपकेंद्र बंद कुलूपबंद आहे. मागील काही महिन्यांपूर्वी येथे लोखो रूपये खर्च करून प्रसूतीगृह उभारण्यात आले. परंतु, हेही वापराविना पडून आहे. त्यामुळे येथील महिलांना प्रसुतीसाठी खाजगी दवाखाना अथवा आष्टा, आलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग धरावा लागत आहे. लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष हे उपकेंद्र मागील आठ ते नऊ महिन्यांपासून बंद असतानाही याकडे ना प्रशासन ना लोकप्रतिनिधीचे लक्ष आहे. त्यामुळेच हे उपकेंद्र आजवर सुरू झाले नाही. याबाबत ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केवळ आश्वासन उपकेंद्रासाठी तीन पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या एकही उपलब्ध नाही. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता, ‘तातडीने कर्मचारी देण्यात येतील’, असे आश्वासन मागील अनेक दिवसापासून ग्रामस्थ ऐकत आहेत. खाजगी रूग्णालयांवर मदार अचलेर या गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या घरात आहे. तसेच येथील उपकेंद्राशी परिसरातील अन्य गावेही जोडण्यात आली आहेत. परंतु, उपकेंद्र बंद असल्याने येथील रूग्णांना आलूर, आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वा खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे.