छत्रपती संभाजीनगर : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेल्या राज्यभरातील तरुणांना तपास यंत्रणांनी लक्ष्य केले आहे. यात जुन्या शहरासह वाळुज औद्योगिक भागातील जवळपास १३ तरुण भट्टीच्या टोळ्यांच्या संपर्कात आल्याचा दाट संशय तपास यंत्रणांना आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी या तरुणांची सात तासांपेक्षा अधिक चौकशी केली. त्यांच्या सोशल मीडिया खात्यांसह आर्थिक व्यवहार झालेत का, याचा तपास आता यंत्रणा करत आहेत.
पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असलेलाा शहजाद भट्टी हा दोन वर्षांत भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो भारतातील बेरोजगार आणि कट्टरपंथीय तरुणांशी संपर्क वाढवून देशविरोधी नेटवर्क उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानसह दुबई, मध्यपूर्वेतील काही ठिकाणांहून नेटवर्क ऑपरेट करत असल्याचा संशय आहे. पैशांचे आमिष, सोशल मीडिया फॉलोइंग आणि कट्टर विचारांचा प्रभाव पाडून तो तरुणांना जाळ्यात ओढतो. गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याची देशातील पाळेमुळे नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी राज्यभरातील जवळपास भट्टीच्या संपर्कातील ६० तरुणांची एटीएसने चौकशी केली.
सोशल मीडियावर फॉलो करणारे अडकले...
-केंद्रिय गुप्तचर यंत्रणांनी भट्टीच्या संपर्कात असलेल्या तरुणांची माहिती गोळा करुन एटीएस पथकांना पुरवली होती. यात शहरातील १३ तरुणांचे नाव निष्पन्न झाले. भट्टी व त्याच्या नातेवाइकांच्याही संपर्कात असलेले तरुण यंत्रणांच्या रडावर होते.
-बुधवारी एटीएसने वाळुज औद्योगिक परिसरासह मिलकॉर्नर, बेगमपुरा, भोईवाड्यातील संशयित तरुणांना सकाळीच ताब्यात घेतले. सात तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, त्यांचे बँक खाते, सोशल मीडियाचे बारकाईने विश्लेषण केले जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
नांदेडातून एटीएसने दोघांना घेतले ताब्यात
नांदेड : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई सुरू केली आहे. या अनुषंगाने नांदेडातही एटीएसकडून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. दहशतवादी भरती आणि हेरगिरीशी संबंधित प्रकरणांमध्ये शहजाद भट्टीचे नाव समोर आले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तरुणांना जाळ्यात ओढत आहे. त्यामुळे केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले असून बुधवारी राज्यभरात धाडी टाकून शहजाद भट्टी किंवा त्याच्या डोगर गँगशी संपर्कात असलेल्या ५७ व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे. त्याच अनुषंगाने नांदेड शहरातील देगलूर नाका आणि इतवारा भागात राहणाऱ्या दोन तरुणांना त्यांच्या घरून ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी करून काही न आढळल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
Web Summary : ATS is investigating 13 youths from Chhatrapati Sambhajinagar for suspected links to Pakistani gangster Shahzad Bhatti. Bhatti lures Indian youths via social media for anti-national activities. Raids across Maharashtra target Bhatti's network.
Web Summary : महाराष्ट्र एटीएस छत्रपति संभाजीनगर के 13 युवाओं से पाकिस्तानी गैंगस्टर शहजाद भट्टी से संदिग्ध संबंधों के लिए पूछताछ कर रही है। भट्टी सोशल मीडिया के माध्यम से युवाओं को राष्ट्र विरोधी गतिविधियों के लिए लुभाता है। महाराष्ट्र में छापेमारी जारी।