पाचजणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By Admin | Updated: December 7, 2015 00:59 IST2015-12-07T00:44:44+5:302015-12-07T00:59:05+5:30

तुळजापूर : शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरून एकास जातीवाचक शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु) येथे शनिवारी घडली.

Atrocity crime against five | पाचजणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

पाचजणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा


तुळजापूर : शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरून एकास जातीवाचक शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु) येथे शनिवारी घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात पाचजणांविरूध्द अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु) येथील मारुती दाजी क्षीरसागर हे त्यांच्या घरासमोरील अंगणात थांबले असता, गणपत भिमराव डांगे, बालाजी गणपत डांगे, रत्नाबाई गणपत डांगे, सुरेखा शिवाजी बचाटे, कविता तुकाराम बचाटे (सर्व रा. तीर्थ (बु) यांनी शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरुन संगनमत करुन जातीवाचक शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या पत्नी व सुनेसही लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची फिर्याद मारुती क्षीरसागर यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात दिली. यावरुन भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ भादंविसह (३), (१), (१०), अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या पाचहीजणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. (वार्ताहर)

Web Title: Atrocity crime against five