शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीतील टँकर जीपीएस विना

By admin | Updated: May 31, 2014 00:55 IST

नितीन कांबळे, कडा आष्टी तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली असल्यामुळे तालुक्यात टँकर सुरू करण्यात आले आहेत.

नितीन कांबळे, कडा आष्टी तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली असल्यामुळे तालुक्यात टँकर सुरू करण्यात आले आहेत. या टँकरला ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम (जीपीएस) यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे टँकरमध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आष्टी तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी मागेल त्या गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या ठिकाणी पाणी उद्भवन आहे. त्या ठिकाणचे नाव , गावाचे नाव , टँकरने किती खेपा मारल्या याचा स्पष्ट उल्लेख करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच टँकरवर जीपीएस मशीन लावावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र टँकरवर हे जीपीएस मशीन बसविण्यात आलेले नसल्याने पाणी वाटपात गैरव्यवहार होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप भाजपाचे राम खाडे यांनी केला आहे. नियमाची अंमलबजावणी केली नाही तर टँकर माफीयांविरोधात उपोषण करणार असल्याचा इशाराही खाडे यांनी दिला आहे. टँकरवर जीपीएस यंत्रणा नसल्याने टँकर किती चकरा मारत आहे, कोठे जात आहे याची माहिती प्रशासनाला उपलब्ध होत नाही. यामुळे पाणी वाटपात गैरव्यवहार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उद्धव सानप म्हणाले, आष्टी तालुक्यात सुरू असणार्‍या टँकरवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. ही यंत्रणा तात्काळ बसवावी, असे संबंधित कर्मचार्‍यांना सांगितले आहे. जीपीएस यंत्रणा बसविल्यानंतर टँकरची सर्व माहिती प्रशासनाला उपलब्ध होईल.