शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची गचांडी धरणारा कुख्यात गुन्हेगार जेरबंद; कोठडीत जाताच हात जोडून मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 19:39 IST

कुख्यात गुन्हेगाराची वाहतूक पोलिसांना मारहाण; 'तेरे को देख लूँगा' म्हणणाऱ्याच्या रात्रीतून आवळल्या मुसक्या

छत्रपती संभाजीनगर : बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्याला थांबण्याचा इशारा करताच त्याने वाहतूक पोलिसांना मारहाण केली. शिवीगाळ करून ‘तेरे को देख लूँगा’, असे म्हणत धमकावले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून अरबाज अहमद शेख (२५, रा. बायजीपुरा) याच्या मुसक्या आवळल्या. मात्र, गेल्या ४८ तासांत वाहतूक पाेलिसांवरील हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

वाहतूक शाखेचे चेतन किशोर गारदे हे सोमवारी रात्री अमरप्रीत चौकात कामावर होते. ८ वाजेच्या सुमारास मोंढा नाक्यावर वाहतूक कोंडी झाली. ती सोडवण्यासाठी गारदे तेथे गेले. तेव्हा बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या अरबाजला पोलिसांनी पकडले होते. अरबाज पोलिसांना मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता. गारदे यांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करताच त्याने त्यांची गचांडी धरली. अन्य अंमलदारांना मारहाण केली. शिवाय जिवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला.

वरिष्ठांनी घेतली गंभीर दखलअरबाजने मोठमोठ्याने पोलिसांना धमकावत हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्याच्या अटकेचे आदेश दिले. रात्रीतून अरबाजच्या मुसक्या आवळून कोठडीत टाकण्यात आले. रात्री पोलिसांना धमकावणारा अरबाज कोठडीत जाताच हात जोडून माफी मागत होता. त्याच्यावर यापूर्वी हल्ला, प्राणघातक हल्ल्याचे चार गुन्हे चिकलठाणा, सिडको, जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले. फौजदार उपेंद्र कुतूर अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Notorious Criminal Arrested for Assaulting Police; Apologizes in Custody

Web Summary : A notorious criminal, Arbaz Ahmed Sheikh, was arrested for assaulting traffic police in Sambhajinagar after a video of the incident went viral. He had previously threatened and abused the officers. Upon being taken into custody, Arbaz apologized with folded hands. He has prior criminal records.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर