दर्गा परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा

By Admin | Updated: May 23, 2014 01:10 IST2014-05-23T00:39:16+5:302014-05-23T01:10:13+5:30

परभणी : राष्टÑीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या हजरत सय्यद शाह तुराबूल हक्क यांच्या दर्गा परिसरात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे.

Arrange drinking water in the Durga area | दर्गा परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा

दर्गा परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा

परभणी : राष्टÑीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या हजरत सय्यद शाह तुराबूल हक्क यांच्या दर्गा परिसरात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे. दर्गा परिसरात विविध जाती धर्माचे लोक श्रद्धेने येतात. परंतु या परिसरात पाण्याची कमतरता असल्याने भाविकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होत नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून भाविक या ठिकाणी येत असतात. परभणी शहर महानगरपालिका होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला. वक्फ बोर्डाचेही या ठिकाणी कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही. भाविकांना सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. येत्या आठ दिवसांत मनपाने पिण्याचे पाणी उपलब्ध करुन न दिल्यास सपाच्या वतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मो.अब्दुल्ला राज, राज्य सचिव करामत खान, जिल्हा महासचिव मोईन खान, अब्दुल सलाम, इमरान खान पठाण, नवीद अहमद, शेरदिल खान, शेख जफर, अ‍ॅड.मनिष मिश्रा, अ‍ॅड.अजय करंडे, अ‍ॅड.पौळ, शेख अजीम, सय्यद जहीर, मोहम्मद खालेक, सुनील सावंत, नागेश सावंत, प्रशांत सावंत, योगेश साळवे, रवी खाडे, नितीन लोखंडे, किरण लोखंडे आदींनी दिला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Arrange drinking water in the Durga area