शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पानगावच्या पाणी योजनेस अखेर मंजुरी

By admin | Updated: June 29, 2014 00:39 IST

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील पानगावची पाणी पुरवठा योजना दरडोई खर्चाच्या निकषात बसत नव्हती.

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील पानगावची पाणी पुरवठा योजना दरडोई खर्चाच्या निकषात बसत नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. अखेर शासनाने या योजनेला हिरवा कंदील दिला आहे. ५८ लाख ५७ हजार ७२९ रुपये इतक्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.पानगाव येथील ग्रामस्थांच्या सोईसाठी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव २ हजार ९०८ रुपये एवढ्या वाढीव दरडोई खर्चाचा होता. परिणामी ही योजना दरडोई खर्चाच्या निकषात बसत नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषदेने सदरील पाणी योजनेचा प्रस्ताव राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे मान्यतेसाठी सादर केला होता. त्यावर शासनाने २ हजार ६०८ रुपये वाढीव खर्च असलेल्या या नळ पाणीपुरवठा योजनेच्या ५८ लाख ५७ हजार ७२९ रुपये इतक्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे पानगावचा पाणीप्रश्न सुटण्यास आता मदत होणार आहे. ‘पेयजल’ अंतर्गत खर्चपानगावच्या पाणीपुरवठा योजनेवर होणारा खर्च हा जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्र अथवा राज्य शासनाच्या निधीतून करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)१०० टक्के घरगुती नळ जोडण्या बंधनकारकयोजना राबवित असताना स्त्रोतांचे बळकटीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सर्र्वांना व्यवस्थितरित्या पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी १०० टक्के घरगुती नळजोडण्यांही द्याव्या लागणार आहेत.मंजूर किंमतीतच योजनेचे कामपानगावची पाणीपुरवठा योजना ही दरडोई खर्चाच्या निकषात बसत नाही. असे असतानाही गावचा पाणी प्रश्न लक्षात घेवून सदरील योजनेला शासनाने हिरवा कंदील दिला आहे. मात्र, हे काम मंजूर किंमतीच्या मर्यादेत राहुनच करावे, अशी अट घातली आहे.