शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद विरोधी पथक, गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी नांदेडात

By admin | Updated: August 15, 2014 00:06 IST

नांदेड : तोतया नक्षलवादी संतोष आमले याला न्यायालयाने १६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़

नांदेड : शहरातील दोन डॉक्टरांना नक्षलवादी असल्याचे सांगून एक कोटींची खंडणी मागणाऱ्या तोतया नक्षलवादी संतोष आमले याला न्यायालयाने १६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ दरम्यान, या घटनेचे गांभीर्य घेत दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्त वार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदेडमध्ये चौकशी सुरू केली आहे़ या प्रकाराबाबत गडचिरोली पोलिसांनाही कळविण्यात आले आहे़नांदेडमधील डॉ़ मनिष कत्रुवार आणि डॉ़ देवेंद्र पालिवाल यांना ६ ते ८ आॅगस्टच्या दरम्यान गडचिरोलीतील माओवादी संघटनेचा कमांडर कोरकू विरंगना बोलत असल्याचे सांगून २० लाखांची मागणी केली़ पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकीही दिली़ त्यावेळी डॉक्टर युनियनचे अध्यक्ष डॉ़ पालीवाल आणि डॉ़ कत्रुवार यांनी पोलिस अधीक्षक परमजीतसिंघ दहिया यांच्याशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली़ त्यावेळी दहिया यांनी तपासाचे आदेश दिले़ स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीधर पवार, पोलिस उपनिरीक्षक शेख रहेमान व सहकाऱ्यांनी संतोष आमले याला नांदेडमधून अटक केली़ तो मूळचा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील रहिवासी आहे़ त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी संपर्क आल्याचे सांगितले़ मात्र त्याने सांगितलेल्या गोष्टी विश्वसनीय नसल्याचे पोलिस सूत्र सांगत आहेत़ खुद्द पोलिस अधीक्षक दहिया, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांनी आमलेची चौकशी केली़दुसरीकडे त्याने सांगितलेल्या गोष्टीबद्दल पोलिसांनी वरिष्ठांना माहिती कळविली आहे़ गडचिरोली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नांदेडमध्ये गुरूवारी दहशतवाद विरोधी पथकाच्या तसेच राज्य गुप्त वार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे़ तोतया नक्षलवाद्याने सांगितलेली कहाणी कितपत खरी आहे याचीही खबरदारी म्हणून शहानिशा करण्यात येत आहे़ स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र संतोष आमले हा तोतयाच असल्याचे स्पष्ट केले आहे़ वजिराबाद पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे उभे केले असता १६ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे़ (प्रतिनिधी)