शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अँथ्रॅक्सची पशुपालकांत भीती

By admin | Updated: April 7, 2016 01:05 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात मेंढ्यांमध्ये अँथ्रॅक्स नावाच्या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात मेंढ्यांमध्ये अँथ्रॅक्स नावाच्या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. अँथ्रॅक्सचा प्रसार रोखण्यााठी बंगळुरूहून हजार लस मागवून लसीकरण सुरू करण्यात आले. अधिकृत निदान होताच अवघ्या ३६ तासांत ही लस येथे मागविण्यात आली. परभणी जिल्ह्यातील भारस्वाडा येथे नुकताच दीडशेहून अधिक मेंढ्यांचा तडकाफडकी मृत्यू झाला. पुणे येथील प्रयोगशाळेत रक्ताचे नमुने पाठविले असता हे मृत्यू अँथ्रॅक्समुळेच झाल्याचे स्पष्ट झाले. अँथ्रॅक्स हा भयंकर विषाणूजन्य आजार आहे. त्याची लागण प्राण्यांप्रमाणेच माणसांनाही होऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाच्या औरंगाबादेतील कार्यालयाकडून तातडीने सूत्रे हलविली गेली. अँथ्रॅक्सची लस केवळ बंगळुरू येथे उपलब्ध होतो. तेथे जाऊन ती आणण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी लागणार होता. तोपर्यंत आजाराचा प्रसार वाढण्याची भीती होती. त्यामुळे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. एम. एन. आठवले, पशुसंवर्धन पर्यवेक्षक आर. बी. शितळे, डॉ. चौधरी यांनी बंगळुरू येथील परिचित व्यक्तींशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना तेथून लस ताब्यात घेऊन कुरिअरने औरंगाबादकडे रवाना करण्याची विनंती केली. त्यानुसार लगेचच सोमवारी ही लस औरंगाबादेत उपलब्ध करून देण्यात आली. येथून ही लस परभणीत पाठविण्यात आली. नंतर तेथे मंगळवारी आणि बुधवारी मेंढ्यांना लसीकरण करण्यात आले. सद्य:स्थितीत मराठवाड्यात एक हजार लस उपलब्ध आहे.