शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

आणखी ५ जणांना १७ लाखांस गंडा

By admin | Updated: July 28, 2014 01:01 IST

हिंगोली : केबीसीत गुंतवणुकीचे आकर्षक प्लॅन दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या १९ आरोपींविरूद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली : केबीसीत गुंतवणुकीचे आकर्षक प्लॅन दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या १९ आरोपींविरूद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अशाच प्रकारे १७ लाखांची फसवणूक झालेल्या ५ तक्रारदारांचे जवाब स्थानिक गुन्हे शाखेने नोंदवले आहेत.कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील शिवाजी भवर यांना फेब्रुवारी २०१२ ते १५ जुलै २०१४ या काळात नाशिकच्या केबीसी मल्टीस्टेट प्रा.लि. कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणुकीचे विविध आकर्षक प्लॅन सांगून रक्कम दुप्पट व तिप्पट देण्याचे आमिष दाखविण्यात आले. बनावट धनादेश देऊन भवर यांची ८६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शिवाजी भवर यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब चव्हाण, आरती चव्हाण, बापूसाहेब चव्हाण, नानासाहेब चव्हाण, सोपान चव्हाण, राजाराम शिंदे, बाजीराव शिंदे, संजय जगताप, भारती शिलेदार, विशाल पाटील, संदीप जगदाळे, छबू चव्हाण, कौशल्या जगताप, पंकज शिंदे, सागर पाटील, सुनीता दातरंगे (सर्व रा. नाशिक), रुस्तुम कंडलिक माहोरे (रा. मसोड) या १९ आरोपींविरुद्ध कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात केबीसी कंपनीकडून फसवणूक झालेल्या तक्रारदारांची संख्या ९० वर पोहोचली असून यातील केवळ ९ जणांनीच पुरावे ठरू शकतील, अशा कागदपत्रांसह सविस्तर फिर्याद दिली आहे. त्याआधारे हिंगोली ग्रामीण व कळमनुरी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून इतर तक्रारदारांचे जवाब नोंदवून ही कागदपत्रे नाशिकच्या आडगाव पोलिसांकडे पुढील तपासासाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शंकर सिटीकर यांनी सांगितले. पोलिस मुख्यालयात या तक्रारींसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)स्थानिक गुन्हे शाखेत स्वतंत्र कक्ष नाशिकच्या केबीसी कंपनीला टाळे लागल्याची वार्ता पसरताच हिंगोली जिल्ह्यातील अनेक एजंट भूमिगत झालेदरम्यान, वसमत येथे एका एजंटचा हृदयविकाराने मृत्यू झाला. प्रारंभी जवळपास ३० तक्रारदारांनी सामूहिक निवेदन देत आपली केबीसी कंपनीकडून फसवणूक झाल्याचा दावा केला होता.पोलिसांनी पैसे भरल्याच्या पावत्या व संबंधित कागदपत्रांची मागणी केलीसामूहिक तक्रारी देणाऱ्यांची संख्या ९० वर पोहोचलेली असली तरी केवळ ९ जणांनीच सविस्तर फिर्याद नोंदवली आहेकळमनुरी व हिंगोली ग्रामीण ठाण्यात २ गुन्हे दाखल असून हे प्रकरण नाशिकला वर्ग केले