शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

ऐन लग्नसराईत बससेवेचा उडाला बोजवारा

By admin | Updated: May 12, 2014 00:01 IST

गोरेगाव : सध्या लग्नसराई आणि उन्हाळी हंगाम सुरू असताना ये-जा करणार्‍या बसफेर्‍यांच्या अनियमिततेमुळे बससेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र गोरेगाव परिसरात पहावयास मिळत आहे.

 गोरेगाव : सध्या लग्नसराई आणि उन्हाळी हंगाम सुरू असताना ये-जा करणार्‍या बसफेर्‍यांच्या अनियमिततेमुळे बससेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र गोरेगाव परिसरात पहावयास मिळत आहे. गत महिन्यापासून चाललेल्या परिवहन विभागाच्या कारभारामुळे बहुतांश बस फेर्‍या नियोजित वेळेत येत नाहीत. काही बसेस शेजारील गावातून परस्पर परतत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडून गैरसोय होत आहे. हिंगोली जिल्ह्याची राजकीय राजधानी संबोधल्या जाणार्‍या तसेच शेजारील ५२ खेड्यांची बाजारपेठ असलेल्या गोरेगावात लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. अशातच बाजारपेठ व व्यावहारिकदृष्ट्या सभोवतालच्या गावासाठी महत्वाच्या असलेल्या या गावात परिवहन विभागाच्या दुर्लक्षाने बससेवेचा बोजवारा उडाल्याने सामान्य प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. गोरेगाव येथे हिंगोली- वाशिम- रिसोड- जिंतूर ही जिंतूर आगाराची बसफेरी नियमित नियोजित वेळेत सुरू आहे; परंतु गत महिन्याभरापासून परिवहन कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे बस सेवेचे नियोजन बिघडलेले आहे. बहुतांश बसफेर्‍यांना नियोजित वेळेचे तारतम्य राहिलेले नसून बसेस अवेळी धावत आहेत. रिसोड आगाराच्या काही बसफेर्‍या शेजारील केंद्रा बु. या गावातूनच परस्पर परत जात आहेत. तर रात्री मुक्कामी येणार्‍या दोन्ही बसफेर्‍या गोरेगावात मुक्कामी न येता केंद्रा बु. व मन्नास पिंपरी येथे मुक्कामी थांबून परस्पर परतत आहेत. हिंगोली आगाराच्या बहुतांश बसफेर्‍या नियोजित वेळेत धावत असून आगाराकडून सदर मार्गावर पाठविण्यात येणार्‍या बसेस जुन्या असल्याने त्यामध्ये सतत बिघाड होतो. परिणामी बसफेर्‍यांच्या वेळेत अनियमितता येत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून नाविलाजाने प्रवाशांना खाजगी वाहनांमधून धोक्याचा प्रवास करून पायपीट करावी लागत आहे. परिवहन मंडळाच्या या कारभारामुळे बससेवा कोलमडली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खाजगी वाहन धारकांना लग्नसराई हंगामाची सुगी साधण्यासाठी संधी मिळत आहे. मात्र प्रवाशांची होत असलेली पायपीट व गैरसोय पाहता राज्य परिवहन विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर) जिंतूरचीही बस थांबेना जिंतूर आगाराची गोरेगाव मार्गे सुरू असलेली जिंतूर, वाशिम बस फेरी कधी-कधी गोरेगाव येथे न थांबता कन्हेरगाव- सेनगाव रस्त्यावरून थेट परस्पर निघून जात आहेत. ५२ खेड्यांची बाजारपेठ असलेल्या गोरेगावातील लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.