शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीतील खिचडी दर्जाहीन

By admin | Updated: July 30, 2014 01:01 IST

घनसावंगी : तालुक्यात प्रकल्प १ व २ मिळून अंगणवाड्या चालविल्या जातात. लहान अंगणवाड्या २५ तर मोठ्या २५३ अंगणवाड्या आहेत.

घनसावंगी : तालुक्यात प्रकल्प १ व २ मिळून अंगणवाड्या चालविल्या जातात. लहान अंगणवाड्या २५ तर मोठ्या २५३ अंगणवाड्या आहेत. कार्यकर्तीची एकूण संख्या २४६ आहे. तर मदतनीस २२७ एवढी असताना अंगणवाड्यांतून दर्जाहीन पोषण आहार तालुक्यात दिला जातो. याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याची तक्रार पालकांकडून होत आहे.अंगणवाडीमधून लहान बालकांना दिल्या जाणाऱ्या आहारात कडधान्याची उसळ, गव्हाच्या तुकड्याचा शिरा, मसूर, मूग पुलाव, वरण भात, खिचडी याप्रमाणे प्रमाणित करण्यात आलेला आहे. काही अंगणवाड्यांमधून तर मेनूच गायब झालेला आहे. यामध्ये मसूर व मूग शिरा कधीच बालकांना दिला नसल्याची तक्रार मातांची आहे. अंगणवाड्यांमध्ये दररोज फक्त पिवळा भात दिला जातो. त्यात तेल नाही, जिरे नसतात. प्रमाणही अत्यल्प असते. पोषण आहारात दिलेला माल हा काही बचत गटामार्फत दिला जातो. व आर्ध्यांना फेडरेशनकडून दिला जातो.१ कोटी २५ लाख खर्चपोषण आहारासाठी तालुक्यात जवळपास १ कोटी २५ लाख रुपये खर्च शासन करते. परंतु हा पैसा सर्व बचत गटाच्या व कार्यकर्ती व मदतनिसाच्या घशात जात असल्याची जोरदार चर्चा आहे.शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे खिचडीचे वाटप करण्यात येत नसल्याच्या तक्रारी होत आहे. अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस हे सर्व गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या जवळची असल्यामुळे त्या कोणासही जुमानत नाहीत. हे चित्र सध्या तालुक्यात आहे.अंगणवाड्यातील खेळाचे साहित्यही मोडकळीस आलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शैक्षणिक साहित्य व खेळणे प्रशासनाकडून मिळाले नसल्याचे अंगवाड्यांमधून सांगण्यात आले. अंगणवाडीतील बालकांना बसण्यासाठी असलेल्या चटया बालकांऐवजी मदतनीस व कार्यकर्त्यांच्या घरी दिसून येत आहेत. गावामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये त्याचा उपयोग केला जात असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळते. (वार्ताहर)घाणीचे साम्राज्य अंगणवाड्यांजवळ नालीचे पाणी, उकिरडे, यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अंगणवाडीचा दर्जा सुधारावा व दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. प्रभारी बालप्रकल्प अधिकारी एस.एन. झरे म्हणाल्या की, तक्रार आल्यास व पालकांनी फोन केल्यास त्वरित अंगणवाड्यांमध्ये जावून पाहणी करून दोषी आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल.