शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅनेमिया चले जाव निश्चय प्रकल्प

By admin | Updated: July 19, 2014 00:44 IST

जालना : जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १० वी वर्गातील सर्व विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन तपासणी, अ‍ॅनेमिया (पांढरा कावीळ) निदान व संपूर्ण उपचार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘अ‍ॅनेमिया चलेजाव निश्चय’

जालना : जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १० वी वर्गातील सर्व विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन तपासणी, अ‍ॅनेमिया (पांढरा कावीळ) निदान व संपूर्ण उपचार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘अ‍ॅनेमिया चलेजाव निश्चय’ २४ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती शुक्रवारी संयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.जि.प.च्या सभागृहात झालेल्या या पत्रपरिषदेस जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, रोटरी क्लब आॅफ जालना रेनबोच्या अध्यक्षा डॉ. आरती मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती.रोटरी क्लब आॅफ जालना रेनबो आणि जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमाने २०१४ ते २०१६ अशा तीन वर्षात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा व कस्तुरबा गांधी विद्यालयातील मुलींची आरोग्य तपासणी अंतर्गत प्रारंभी आरोग्य प्रबोधन, वैद्यकीयदृष्ट्या माहिती व समुपदेशन करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या ३२ शाळा व कस्तुरबा गांधी ७ शाळांमधील ४५३७ मुलींची हिमोग्लोबीन तपासणी, दंत तपासणी चिकित्सा, मोफत टूथ ब्रश व टूथ पेस्ट वाटप करण्यात येणार आहे. रक्तातील हिमोग्लोबीन तपासणीत अ‍ॅनेमिया निदान झालेल्या मुलींवर संपूर्ण मोफत उपचार करण्यात येणार आहे. सर्व मुलींच्या आहाराचे सर्व्हेक्षण व समुपदेशन, व्यक्तिगत घरातील स्वच्छतागृहे यांचे सर्वेक्षण, स्वच्छतेचे समुपदेशन करण्यात येईल. रोटरी रेनबोचे ७२ सदस्य, जि.प. आरोग्य विभागाचे ३ टेक्नीशिअन, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, शाळेतील शिक्षिका, मुख्याध्यापक व रेनबो रोटरीतील डॉक्टर या सर्वांचा सदरील उपक्रमात सहभाग असणार आहे. यावेळी कृउबा संचालक पंडितराव भुतेकर, शिक्षणााधिकारी राऊत, आरोग्य अधिकारी भटकळ उपस्थित होते.(प्रतिनिधी)शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अ‍ॅनेमिया शरीरात रक्त कमी किंवा जास्त तयार होणे, रक्त जास्त नष्ट होणे या कारणांमुळे हिमोग्लोबीन तयार होत नाही. त्यामुळे अ‍ॅनेमियाचा आजार होण्याची शक्यता असते. नवविवाहित महिलांना शरीरात हिमोग्लोबीन चांगले असेल तर त्या माता बनण्यास सक्षम असतात, असे यावेळी डॉ. आरती मंत्री यांनी सांगितले. मुलींना आयर्नच्या गोळ्या देण्यात येणार आहेत. मुली गोळ्या खातात किंवा नाही, याचीही चाचपणी करण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांनी सहमती दर्शविल्याने रोटरी क्लब रेनबोच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.