शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबा अन् त्याचे साथीदार सापडेनात

By admin | Updated: August 2, 2014 01:44 IST

औरंगाबाद : जादूने पैशाचा पाऊस पाडून चौपट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवीत अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा

औरंगाबाद : जादूने पैशाचा पाऊस पाडून चौपट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवीत अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा भोंदूबाबा साहेबखान व त्याचे साथीदार अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. विशेष म्हणजे या टोळीत सहभागी असलेल्या पोलिसांची अद्याप ओळख परेडही घेण्यात आलेली नाही. नारेगाव येथील रहिवासी असलेला साहेबखान यासीन खान ऊर्फ सत्तार बाबा, त्याचा साथीदार अश्फाक व डॉ. शेख या तिघांनी सिडको एमआयडीसी ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लुटमारीचा धंदाच सुरू केला होता. पैशाचा पाऊस पाडून चौपट रक्कम करून देतो, असे आमिष दाखवून बाबा व त्याचे पंटर ग्राहकांना शोधून आणत. मग बाबा पाऊस पाडण्यासाठी चिकलठाणा परिसरातील एका शेतात जादूचा खेळ मांडत. त्याच वेळी सिडको एमआयडीसी पोलीस तेथे छापा मारत आणि सगळे काही लुटून घेऊन जात. नंतर पोलीस व बाबा लुटलेल्या रकमेचे हिस्से करून घेत होते. लुटलेला इसम तक्रार देण्यासाठी गेला तर त्याची फिर्यादही नोंदवून घेण्यात येत नव्हती. उलट धमकावून फिर्यादीला हुसकावून लावण्यात येत असे. अशा पद्धतीने चोर - पोलिसांच्या या टोळीने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे नुकतेच उघड झाले आहे. या टोळीविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्हेही सिडको एमआयडीसी ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान, या बाबाच्या टोळीत सहभागी असलेले पोलीस कोण आहेत, याचा छडा लावण्यासाठी पोलिसांची ओळख परेड घेणे गरजेचे आहे; परंतु अद्याप ही ओळख परेड झालेली नाही. त्यामुळे हे पोलीसही बाबाप्रमाणेच फरार होण्याची शक्यता आहे. पोलिसांशी मिलीभगत असल्याने गुन्हे दाखल होण्याची चाहूल लागताच बाबा व त्याचे साथीदार पसार झाले आहेत. अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यात सहभागी असल्याने पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांनीच आता या तपासावर लक्ष केंद्रित केले आहे.