शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

सोने तारण कर्जावर तोकडी रक्कम

By admin | Updated: June 9, 2014 00:10 IST

घनसावंगी : तालुक्यातील कुंभारपिंपळगाव परिसरातील सोनेतारण कर्जावर कमी रक्कम मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.

घनसावंगी : तालुक्यातील कुंभारपिंपळगाव परिसरातील सोनेतारण कर्जावर कमी रक्कम मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले असल्याचे पहावयास मिळत आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती. त्यातील कुंभार पिंंपळगाव सर्कल नुकसान भरपाईतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळाला नाही. त्यातच सोने तारण कर्जावरील एकूण रक्कमेच्या ८० टक्के रक्कम मिळत असून मुळ रक्कमही अत्यल्प ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या सोन्याचे भाव ज्वेलर्स मध्ये २७०० रूपये प्रतिगॅ्रम भाव असून सोने तारण कर्जासाठी खाजगी सहकारी पतसंस्था ह्या २२०० रू. भाव ठरवून त्यातुनही ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हाती देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला कवडीमोल भावाने सोने बँकेत ठेवून व्याजाचे पैसे मिळत आहेत. त्यामुळे भविष्यकाळात शेतकऱ्याला सावकराचे दार ठोठावण्याची वेळ येणार असल्याचे चित्र आहे.
गारपीट झालेल्या भागातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. भरपाई न मिळाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता. त्यातच आता खाजगी बँकाही सोनेतारणाचा कमी भाव ठरवून सोने तारण होत असल्याने शेतकरी मात्र दुहेरी कात्रीत सापडलेला आहे. त्यातच बियाणेचाही भाव कडाकले असल्याने शेतकरी आणखीनच कोंडीत सापडला आहे.
त्यातच सोने तारण कर्जावर बँक तोकडी रक्कम देत असल्यानेही रक्कम ही रक्कम वाढून देण्याच मागणी शेतकरी करीत आहे.सोने तारण कर्जाची रक्कम ही दुकानाच्या भावाने ठरवून त्यातील काही अंशी रक्कम देण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक अडचण कमी होईल, सोने तारण कर्जाला योग्य भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. (वार्ताहर)
शेतकरी प्रतीक्षेत
सोने तारण कर्जावर बँकेकडून रक्कम वाढवून मिळेल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. खरीप हंगाम जवळ आला असून त्यापूर्वी ही रक्कम वाढवून मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून होत आहे.