शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

अंबड तालुक्यातील मोसंबी बागा संकटात

By admin | Updated: July 16, 2014 01:26 IST

शेवगा : अंबड तालुक्यातील मोठ्या क्षेत्रावरील मोसंबी फळबागा संकटात सापडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कमी पडत असलेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

शेवगा : अंबड तालुक्यातील मोठ्या क्षेत्रावरील मोसंबी फळबागा संकटात सापडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कमी पडत असलेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातील निम्म्या मोसंबी बागाचे सरपण झाले आहे. आज थोड्या फार प्रमाणात ज्या बागा उभ्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या हिंमतीवर उभ्या आहेत. आजच्या परिस्थितीला पाऊस लांबल्याने मोसंबी बागा जगवणे कठीण झाले आहे. या बागा वाचाव्यात याकरिता बळीराजा आभाळाकडे नजर लावून बसला आहे.मागच्या काही महिन्यांपूर्वी गारपीट, दुष्काळ आणि आता लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गारपीटीमुळे रबीचे पूर्ण पीक वाया गेले. धान्य नाहीच तसेच गारपीट याद्यात मोठा घोळ यामुळे बळीराजा खूप मोठ्या संकटात आहे. आज पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तालुक्यातील मोसंबी, आंबा, डाळींब या फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मोठा पाऊस न झाल्यास मोसंबी बागा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.मोसंबी पीक बहरत असताना गारपीट झाली. यामुळे आंबा बार बळीराजाच्या हातून गेल्यामुळे बळीराजा खचून गेला आहे. मोसंबी, डाळींब, आंबा बागा वाचविण्यासाठी शासनाने उपाययोजना करुन तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेवगा, हरतखेडा, लालवाडी, सारंगपूर, दूधपुरी, दहिपुरी, बोरी, पारनेर, धनगर पिंप्री आदी गावातून होत आहे.(वार्ताहर)