शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अजब तलाठ्याची गजब कहाणी

By admin | Updated: July 10, 2014 01:15 IST

कन्नड : तालुक्यात वाटप करण्यात आलेल्या गारपीट अनुदानात झालेले घोळ उघडकीस येऊ लागले आहेत.

कन्नड : तालुक्यात वाटप करण्यात आलेल्या गारपीट अनुदानात झालेले घोळ उघडकीस येऊ लागले आहेत. तालुक्यातील बरकतपूर येथे अनुदान वाटप करताना शेतकऱ्यांकडे असलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राची नुकसानभरपाई देणे, गटात जमीनच नसलेल्या शेतकऱ्याच्या नावे अनुदान देणे, असे प्रकार घडले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून तलाठ्यास कार्यमुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.बरकतपूर-रायगाव ही गावे वाकद सजेअंतर्गत येत असून, या दोन्ही गावांत एकूण ९०० शेतकरी असून, यातील फक्त ३७१ शेतकऱ्यांना गारपीट अनुदान मिळाले. उर्वरित ५५० शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. वाकद सजेचे तलाठी बी. के. चौधरी यांनी शेतावर जाऊन पंचनामे न करता कार्यालयातच बसून केले, तसेच पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करण्यात आली. ज्यांनी पैसे दिले, त्यांच्या नावावर क्षेत्र नसतानाही पंचनामे करून त्यांना अनुदान मिळवून दिले.बरकतपूर येथील गट क्र. ७१ हा विठ्ठल देशमुख, विश्वास देशमुख व संजय सोन्ने यांच्या नावावर आहे; मात्र याच गट नंबरवर अण्णा कौतिक यांचे १ हे. ८१ आर क्षेत्र कांदा पिकाचे दाखविण्यात आले. त्यांना १२ हजार रुपये अनुदान मिळाले. गट नं. ३५५ मध्ये फकिरा भागाजी यांचे ०.०२ आर क्षेत्र असून, त्यांचे ०.३० आर गव्हाचे नुकसान दाखविण्यात आले. त्यांना ३ हजार रुपये नुकसान भरपाई मिळवून दिली, असे आरोप निवेदनात करण्यात आले आहेत. या तलाठ्याची चौकशी करून त्यास कार्यमुक्त करावे, वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून द्यावे; अन्यथा १८ जुलैपासून तहसीलसमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.