शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांवर ‘किराणा’ घोटाळ्याचा आरोप

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

औरंगाबाद : महापौर कला ओझा यांनी महापालिकेच्या खर्चातून बेहिशोबी किराणा माल खरेदी केला.

औरंगाबाद : महापौर कला ओझा यांनी महापालिकेच्या खर्चातून बेहिशोबी किराणा माल खरेदी केला. तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या प्रवास व पाहुणचार भत्त्यातही त्यांनी हात धुऊन घेतल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी केला. माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार महापौरांनी पदाचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करून पोलिसांत तक्रार द्यावी, अशी मागणी दाभाडे यांनी आज केली. महापौरांना खा. चंद्रकांत खैरे हे बळ देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रमोद राठोड, गटनेता मीर हिदायत अली यांची उपस्थिती होती. दाभाडे म्हणाले की, महापौरांनी दरमहा किराणा खरेदीवर लाखो रुपये खर्च दाखविला आहे. मागील २० महिन्यांत पालिकेतील व बाहेरील कुणालाही पाहुणचार झालेला नाही. त्यांनी स्वत:च्या नावाने पाहुणचाराची बिले उचलली आहेत, तर काही बिले जवळच्या व्यक्तीच्या नावाने उचलली आहेत. एकेका महिन्यात ४०-४० ‘बाथसोप’ची खरेदी दाखविण्यात आलेली आहे. किराणा पुरवठादाराचीदेखील चौकशीची मागणी त्यांनी केली. बजेट बुक जाळल्यामुळे महापौरांनी पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिल्याने गुन्हा दाखल झाला. त्याचा सूड म्हणून हे प्रकरण बाहेर काढले का, असे विचारले असता दाभाडे म्हणाले की, तसे काहीही नाही. पालिकेत आलेला पैसा जनतेचा आहे. त्याची उधळपट्टी कशी होते आहे, हे दाखविण्यासाठी हे प्रकरण उघडकीस आणले. प्रवास भत्त्यातही घोळमहापौर पालिकेचे वाहन वापरत नाहीत. त्यामुळे त्यांना दरमहा ४० हजार रुपये प्रवास भत्ता दिला जातो. त्यातून त्यांच्या वाहनचालकाचे वेतन करावे लागते. मात्र, मनपाच्या आस्थापनेवरील दोन वाहनचालक त्यांना देण्यात आले आहेत. त्यातील एक चालक त्यांच्या खाजगी वाहनावर आहे. सुरेश साळवे, उत्तम मोकळे हे मनपाचे चालक महापौरांच्या खाजगी वाहनावर आहेत. दोघांना अनुक्रमे २१ हजार, १७ हजार इतके वेतन मनपा देते. ७ लाख रुपयांचे वेतन या चालकांनी मनपाकडून घेतले आहे. महापौरांनी आरोप फेटाळलेमहापौर कला ओझा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. दाभाडे यांनी मागील २० महिन्यांत एकही सभा सुरळीत होऊ दिली नाही. बजेट बुक जाळल्यामुळे त्यांच्यावर केलेल्या पोलीस तक्रारीमुळे त्यांनी सूडभावनेने माझ्यावर आरोप केले आहेत. मनपा महापौरांना ज्या सुविधा देते, तेवढ्याच घेत आहे. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. किराणा माल, पाहुणचार भत्त्यात काहीही बदल केलेला नाही. ४० बाथसोप दोन-तीन महिन्यांच्या बिलातील असतील.प्रशासनाचे मत असे...नगरसचिव प्रमोद खोब्रागडे म्हणाले की, महापौरांना दोन वाहनचालक देता येतात. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्या आदेशानुसार दोन वाहनचालकांची नियुक्ती केलेली आहे. एक वाहनचालक जादा द्यावा लागतो.