सर्व शिक्षा; तरीही उपेक्षा!

By Admin | Updated: June 22, 2015 00:21 IST2015-06-21T00:14:56+5:302015-06-22T00:21:22+5:30

बीड : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातात. लाभार्थीसंख्या एक लाख ४२ हजारावर आहे;

All education; Ignore Yet! | सर्व शिक्षा; तरीही उपेक्षा!

सर्व शिक्षा; तरीही उपेक्षा!


बीड : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातात. लाभार्थीसंख्या एक लाख ४२ हजारावर आहे;परंतु अद्याप एकाही विद्यार्थ्यास गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मोफत पुस्तकांसोबतच गणवेश देखील दिला जातो. सर्व मुली व अनुसूचित जाती- जमाती, दारिद्र्यरेषेखालील पहिली ते आठवीचे विद्यार्थी त्यासाठी पात्र आहेत. शाळा सुरु होऊन सहा दिवस उलटले;परंतु विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ मिळाला नाही. प्रत्येक विद्यार्थ्यास दोन गणवेश दिले जाणार आहेत. एका गणवेशासाठी २०० रुपयांची तरतूद आहे.
एक लाख ४२ हजार ७७६ विद्यार्थ्यांवर प्रत्येकी ४०० रुपयांप्रमाणे पाच कोटी ७१ लाख १० हजार ४०० रुपये खर्च होत आहे.
जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व मुलींची संख्या ९८ हजार ५६८ इतकी आहे. अनुसूचित जाती- जमाती, दारिद्र्यरेषेखालील पहिली ते आठवीचे विद्यार्थी ४४ हजार २०८ इतकी आहे. (प्रतिनिधी)
गणवेशासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी आम्ही आधीच केलेली होती. शुक्रवारीच पाच कोटी ३ लाख ८५ हजार एवढा निधी आलेला आहे. तो गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्गही केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या नावे तो लवकरच जमा केला जाईल. त्यानंतर गणवेशाचा प्रश्न मार्गी लागेल. एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊ.
- सुखदेव सानप,
शिक्षणाधिकारी (प्रा.)

Web Title: All education; Ignore Yet!