शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहाय्यकांचे अप-डाऊन

By admin | Updated: June 6, 2014 01:05 IST

अंबड : शेतकर्‍यांना शेतीसंबधी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने कृषी सहाय्यकांची नेमणूक केली खरी, परंतु नियुक्त केलेल्या कृषीसहायकांकडून सर्वसामान्य शेतकर्‍यांना आवश्यक

अंबड : शेतकर्‍यांना शेतीसंबधी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने कृषी सहाय्यकांची नेमणूक केली खरी, परंतु नियुक्त केलेल्या कृषीसहायकांकडून सर्वसामान्य शेतकर्‍यांना आवश्यक ते मार्गदर्शन व मदत होतच नसल्याचे चित्र समोर आले आहे.
तालुक्यातील बहुतांश कृषी सहाय्यक मुख्यालयी न राहता अंबड, जालना येथून कारभार करत असल्याने शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शासन कोट्यवधी खर्च करुन शेतकर्‍यांसाठी विविध योजना अंमलात आणत असले तरी या योजनांची माहिती कृषी सहाय्यक शेतकर्‍यांपर्यंत पोहचवत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे योजनांच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम तालुक्यात सर्वदूर होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणजे कृषी सहाय्यक आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना शेतीविषयी योग्य सल्ला, मिळावा, शासनाच्या योजनांची माहिती मिळावी, शेतकर्‍यांसाठीच्या योजना योग्य प्रकारे राबविण्यात येत आहेत की नाही, याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी, या उद्देशाने कृषी विभागाने कृषी सहाय्यकांची नेमणूक केलेली आहे. ही सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी कृषी सहाय्यकांनी नेमून दिलेल्या गावी म्हणजेच मुख्यालयी राहणे बंधनकारकसुद्धा करण्यात आले आहे.
गावामध्ये राहून शेतकर्‍यांच्या गाठीभेटी घेणे, त्यांना शेतीविषयक योग्य मार्गदर्शन करणे, शासनाच्या विविध योजनांची विस्तृत माहिती देणे, पिकांविषयी विस्तृत माहिती देणे आदी कामे कृषी सहाय्यकांनी करणे अपेक्षित आहे.
मात्र तालुक्यातील बहुतांश कृषी सहाय्यक या शासकीय आदेशाची पायमल्ली करत आहेत. नियुक्त गावांमध्ये आठवडयातून एक किंवा दोन दिवस हे कृषी सहाय्यक भेट देऊ लागले आहेत. कृषी सहाय्यक गावांमध्ये येत नसल्याने शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे केवळ आपल्या मर्जीतील शेतकर्‍यांपर्यंतच या योजनांचा लाभ कसा पोहचवता येईल, यासाठी हे कृषी सहाय्यक प्रयत्न करताना दिसतात. मर्जीतील शेतकर्‍यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्याच्या दलालीतुन अनेक कृषी सहाय्यक मोठी मलाई मिळवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघ यांनी केला आहे.
दरम्यान, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना मार्गदर्शन न करणार्‍या व शेतकर्‍यांची अडवणूक करणार्‍या व मुख्यालयी न राहणार्‍या कृषी सहाय्यकांवर कडक कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष संतोष जेधे यांनी केली आहे. (वार्ताहर)
कारभाराविषयी नाराजी
कृषी विभागात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु असून, अनेक योजनांची अमंलबजावणी पारदर्शकपणे होत नाही. शासकीय योजनांपैकी अनेक योजना केवळ कागदावरच राबविण्यात आलेल्या असुन प्रत्यक्षात मात्र काही मोजक्याच धनदांडग्यांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ मिळवुन देण्यात आला आहे. हा प्रकार सध्याही सुरु असुन यामध्ये कृषी सहाय्यकांसह कृषी विभागातील काही अधिकार्‍यांचा सहभाग असुन मागील काही काळात राबविण्यात आलेल्या सर्व योजनांची सखोल चौकशी व्हावी अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष संतोष जेधे यांनी व्यक्त केली.