शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
4
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
5
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
6
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
7
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
8
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
9
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
10
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
11
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
12
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
13
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
14
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
15
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
16
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
17
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
18
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
19
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
20
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
Daily Top 2Weekly Top 5

एजंटांच्या ‘दादागिरी’ला अखेर आयुक्तांचा चाप !

By admin | Updated: November 19, 2014 00:58 IST

उस्मानाबाद : येथील परिवहन कार्यालयात (आरटीओ) एजंट आणि अनधिकृत व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात वावर होता. लहानसहान कामांनाही अवाजवी रक्कमा

उस्मानाबाद : येथील परिवहन कार्यालयात (आरटीओ) एजंट आणि अनधिकृत व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात वावर होता. लहानसहान कामांनाही अवाजवी रक्कमा मोजाव्या लागत होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांतून याबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. अखेर परिवहन आयुक्तांनीच मुंबई येथील कार्यालयात स्वत:च्या डोळ्यांनी हा गोरखधंदा पाहिल्यानंतर त्यांनी १७ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्वच कार्यालयांना पत्र पाठवून ‘एजंटांची मनमानी थांबवा’ असे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आता येथील अधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. परिवहन कार्यालयात अनधिकृत व्यक्ती व एजंटांचा सर्रास वावर दिसून येत होता. एजंटांच्या वाढलेल्या या वावराने सर्वसामान्यांची कामे वेळेत होतील, याची शाश्वती नव्हती. याबाबत अनेकवेळा तक्रारी होवूनही अधिकाऱ्यांवर काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे सदरील एजंट मंडळीही ‘आपले कोण काय करणार’? या अविर्भावात वावरत होती. अशाच स्वरूपाचा प्रकार प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई (पश्चिम) येथील कार्यालयात खुद्द परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या नजरेस आला होता. तसेच त्यांनी येथील काही एजंटांच्या डायऱ्याही तपासल्या होत्या. या डायऱ्यांमध्येही धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या होत्या. जे काम शासन नियमानुसार तीस रूपयांत होणार होते, त्यासाठी त्यांनी शंभर ते दीडशे रूपये घेतल्याचे समोर आले होते.दरम्यान, हा प्रकार पाहिल्यानंतर झगडे यांनी राज्यातील सर्वच परिवहन कार्यालयांना (आरटीओ) पत्र पाठवून कार्यालयांतील अनधिकृत व्यक्ती, एजंटांचा वावरास पायबंद घालण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. येथील परिवहन कार्यालयाला हे पत्र १७ नोव्हेंबर रोजी मिळाले आहे. त्यानुसार येथील कार्यालयाने आयुक्तांच्या सदरील आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. कार्यालयामध्ये एजंट वा अनधिकृत व्यक्तींना सहजासहजी प्रवेश करता येवू नये, यासाठी तरी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वसामान्यांची कामे वेळेवर व्हावीत, यासाठी ‘एक खिडकी’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्वांना समान न्याय मिळण्यासोबतच कामेही तातडीने मार्गी लागण्यास मदत होईल, असे उपप्रदेशिक परिवहन अधिकारी संजय म्हैैत्रेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)