पुन्हा पाच दुचाकी वाहने जाळली

By Admin | Updated: January 20, 2015 01:27 IST2015-01-20T01:11:50+5:302015-01-20T01:27:31+5:30

वाळूज महानगर : बजाजनगरात माथेफिरू टोळीने रविवारी मध्यरात्री पुन्हा पाच दुचाकी पेटवून दिल्यामुळे वाहनधारकांत चांगलीच खळबळ उडाली आहे.

Again five bikes were burnt down | पुन्हा पाच दुचाकी वाहने जाळली

पुन्हा पाच दुचाकी वाहने जाळली


वाळूज महानगर : बजाजनगरात माथेफिरू टोळीने रविवारी मध्यरात्री पुन्हा पाच दुचाकी पेटवून दिल्यामुळे वाहनधारकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ही टोळी अजून मोकाटच आहे.
बजाजनगरात गेल्या पाच वर्षांपासून दुचाकी व चारचाकी वाहने जाळण्याच्या घटना सुरू आहेत. ही टोळी घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकी बेमालूमपणे जाळून टाकून पसार होत आहे. या टोळीने पोलीस प्रशासनाला एक प्रकारे खुले आव्हान दिले असून, हे आव्हान पेलण्यात पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. रविवारी मध्यरात्री बजाजनगरातील हेमराज विश्वास सनेर (दुचाकी क्रमांक एमएच-२० डीजी १३४३), आनंदा प्रभाकर शंकरवार (दुचाकी क्रमांक एमएच-२० सीएक्स-०२५२), सुरेश अंबुसकर (दुचाकी क्रमांक एमएच-२० सीझेड-८४०४),अमोल काकडे (विनापासिंग ) व गिरीश पाटील (दुचाकी क्रमांक एमएच-१९, बीपी ८१३७ ) या पाच दुचाकींना आग लावून माथेफिरू पसार झाले. रात्री १२.३० ते पहाटे ४.४५ या वेळेत वेगवेगळ्या ठिकाणी पाच दुचाकी जाळण्यात आल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे एमआयडीसी वाळूज पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाकडून रात्रीची गस्त सुरू असतानाही ही टोळी पोलिसांना चकमा देण्यात सतत यशस्वी ठरत असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पाच दुचाकी जळीतप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघा संशयितांना आज ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून सोडून देण्यात आले.

Web Title: Again five bikes were burnt down