सहा महिन्यानंतर आज जिल्हा नियोजन समितीची बैठक

By Admin | Updated: August 17, 2015 01:06 IST2015-08-17T00:29:58+5:302015-08-17T01:06:19+5:30

बीड : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विकास कामांवर करण्यात आलेल्या निधी खर्चाची आढावा बैठक सोमवारी होत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची ठरू शकते

After six months, the meeting of District Planning Committee today | सहा महिन्यानंतर आज जिल्हा नियोजन समितीची बैठक

सहा महिन्यानंतर आज जिल्हा नियोजन समितीची बैठक


बीड : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विकास कामांवर करण्यात आलेल्या निधी खर्चाची आढावा बैठक सोमवारी होत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची ठरू शकते. ६ फेब्रुवारी २०१५ दरम्यान झालेली डीपीसीची बैठक गुंडाळण्यात आली होती.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूरी मिळालेल्या कामांना गती देण्यासाठी जून दरम्यान २४० कोटी ७८ लाख रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाच्या खात्यावर जमा झालेला आहे. आता पर्यंत या निधीमधून ५० कोटी रूपये विविध कामांसाठी खर्च करण्यात आलेले आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूरी दिलेल्या कामांवर खर्च झालेल्या निधी, झालेले काम याबाबतचा आडावा सोमवारी होणाऱ्या डीपीसी च्या बैठकीत आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. दुष्काळी स्थिती असल्यामुळे नव्या घोषणा होण्याची शक्यता असून, जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)
पालकमंत्री पंकजा मुंडे बैठकीला उशिरा आल्या अन् आम्हाला बैठकी दरम्यान सन्मानाची वागणूक दिली नाही, हा मुद्द पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी फेब्रुवारी २०१५ दरम्यान झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र सोमवारी होत असलेली डीपीसीची बैठक दुष्काळ निवारणाच्या संदर्भाने काही उपाय योजना करण्याच्या दुष्टीने चर्चा करण्यासाठी महत्वाची ठरू शकते. सोमवारच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: After six months, the meeting of District Planning Committee today