शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

२८ नंतर ८४ आता १२५ दिवसांनंतरही लस नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:05 IST

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यावा, हा निकष केंद्र शासनाने लसींचा तुटवडा ...

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यावा, हा निकष केंद्र शासनाने लसींचा तुटवडा जाणवताच थेट ८४ दिवसांवर नेला. आता १२५ दिवस उलटले तरी हजारो नागरिकांना दुसरा डोस मिळालेला नाही. दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करणाऱ्या शहरातील नागरिकांची यादी थेट एक लाखावर गेली आहे.

जिल्ह्यात आठ लाख ११ हजार ४८ नागरिकांनी पहिला, तर दोन लाख ८९ हजार ३०० जणांना दुसरा डोस मिळाला आहे. लसीकरण सुरू केल्यावर केंद्र शासनानेच दुसरा डोस २८ दिवसांनंतर घ्यावा, असे जाहीर केले. लसींचा तुटवडा जाणवताच दुसरा डोस थेट ८४ दिवसांवर नेण्यात आला. आता नागरिकांचे १२५ दिवस उलटले तरी लस मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. शहरात व ग्रामीण भागातही परिस्थिती अशीच आहे.

मोबाइलवर मेसेज येतो; पण...

८४ दिवसांनंतर दुसरा डोस घेण्यासाठी केंद्र शासनाचा नागरिकांना मोबाइलवर मेसेज तर येतो; पण लसच मिळत नाही. कालावधी संपून चार ते सहा आठवडे उलटले तरी अनेकांना लस मिळत नाही. आरोग्य यंत्रणा लस येईल एवढेच सांगत आहे. आलेली लस कधी संपते हे कळतही नाही.

विदेशात जाणाऱ्यांना २८ दिवसांत दुसरा डोस

विदेशात जाणाऱ्या नागरिकांना आजही केंद्र शासन २८ दिवसांनंतरच दुसरा डोस उपलब्ध करून देत आहे. विदेशात ८४ दिवसांनंतर दुसरा डोस चालत नाही. अनेक देशांनी २८ दिवसांनंतर दुसरा डोस घ्यावा हा दंडक केला आहे. शिवाय तिसरी लाट डोळ्यासमोर ठेवून बूस्टर डोस देण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर ॲण्टिबॉडीज किती दिवस टिकतात हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. विदेशात अनेक ठिकाणी बूस्टर डोस सुरू झालाय, ही वस्तुस्थिती आहे. शासनाने जे निकष ठरवून दिले त्यानुसार काम सुरू आहे. ॲण्टिबॉडीजची तपासणी केल्यानंतर अनेक बाबींचा उलगडा होतो. यावर संशोधन सुरू आहे.

डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा