शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

आपेगावला नवीन पूल होणार

By admin | Updated: November 27, 2014 01:09 IST

पैठण : बेसुमार वाळू उपशामुळे गोदावरी नदीवरील आपेगाव-कुरणपिंप्री या गावांना जोडणारा २९० मीटर लांबीचा पूल ८ नोव्हेंबर रोजी खचला होता.

पैठण : बेसुमार वाळू उपशामुळे गोदावरी नदीवरील आपेगाव-कुरणपिंप्री या गावांना जोडणारा २९० मीटर लांबीचा पूल ८ नोव्हेंबर रोजी खचला होता. या पुलाची तपासणी बुधवारी राज्य शासनाने गठित केलेल्या समितीने केली. दुरूस्तीला दहा कोटींचा खर्च येणार असल्याने या पुलाची दुरुस्ती करण्यापेक्षा येथे नवीन पूल उभारण्याचा सूर या समितीचा दिसून आला.दरम्यान, पुलाच्या शाबूत असलेल्या भागातून किती वाळू उपसा झाला आहे याची तपासणी करा, असे आदेश या समितीने स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या समितीचे अध्यक्ष मुख्य अभियंता सी.पी. जोशी यांच्यासह विभागाचे मंत्रालयातील अवर सचिव राम गुढे, दक्षता व गुणनियंत्रक मंडळाचे अधीक्षक अभियंता व्ही.व्ही. कुळकर्णी, संकल्प चित्र विभागाचे अधीक्षक अभियंता ठुबे यांच्या समितीने पुलाची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता वृषाली गाढेकर, उपविभागीय अभियंता एन.बी. चौरे, शाखा अभियंता जायभाये आदी उपस्थित होते.पुलाच्या नवीन बांधकामासाठी अंदाजे १० कोटी रुपये खर्च येणार आहे. या पुलाची दुरुस्ती करण्यापेक्षा तेथे नवीन पूल उभारणेच योग्य होईल, असा सूर या समितीचा होता. दरम्यान, नवीन पूल बांधताना बंधाऱ्याची उंची व जलसाठा पाणीपातळी विचारात घ्यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)८ नोव्हेंबर रोजी आपेगाव व कुरणपिंप्री यांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील २९० मीटर लांबीचा पूल खचला होता. पुलाच्या १२६ कमानींपैकी ४२ कमानी क्षतिग्रस्त झाल्याने पुलावरील वाहतूक बंद पडली होती. बेसुमार वाळू उपसा झाल्याने ८० वर्षे वयोमर्यादा असलेला पूल अवघ्या १२ वर्षांत खचला, असा निष्कर्ष या पुलाची पाहणी केल्यानंतर शासकीय अधिकारी व तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नियुक्त केलेली समिती काय निष्कर्ष काढते, याकडे लक्ष लागले आहे.